Sanjay Raut | संजय राऊतांना मोठा दणका ! कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी शौचालय घोटाळ्यासंबंधीत (Toilet Scam) केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी कोर्टात हजर न राहिल्याने शिवसेना नेते (Shivsena Leader) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात शिवडी कोर्टाने (Shivdi Court) जामीनपात्र अटक वॉरंट जारी (Bailable Arrest Warrant Issue) केले आहे.

 

मुंबई महानगर दंडाधिकारी (Mumbai Metropolitan Magistrate) यांनी मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या
तक्रारीवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 499, 500 साठी वॉरंट जारी केले.
शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.

 

बंडखोरीमुळे पक्षाची झालेली वाताहात आणि सत्ता गेल्याने शिवसेनेसमोरील अडचणी वाढलेल्या असतानाच
आता शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती.
संजय राऊत यांनी 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला होता.

 

Web Title :- Sanjay Raut | sewree court issues bailable arrest warrant for shivsena leader and mp sanjay raut

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा