Sanjay Raut | शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना EDची भिती; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी (Rebel Shivsena MLA) केल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. याच दरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खळबळजनक दावा केला आहे. ज्या आमदारांविरुद्ध किरीट सोमय्या (Kirit Somaiya) रोज पत्रकार परिषद घेत होते. ज्यांच्यावर ईडीच्या (ED) कारवाया झाल्या, ते शिवसेना सोडून गेले. कारण 24 तासात फडणवीसांनी (Devendra Fadnavis) त्यांच्यावरील कारवाया क्लिअर केल्या, असा खळबळजनक दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

 

संजय राऊत म्हणाले, सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी शिवसेना भवनासमोर फार मोठा आक्रोश मोर्चा काढला. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. मलाही बोलवण्यात आलं होतं. पण दुसऱ्या दिवशी ते पळून गेले. छातीत दुखत आहे असे सांगत रुग्णालयात दाखल व्हायचं आहे म्हणाले आणि घरी गेले. नंतर मागच्या दारातून पळून गेले. दोन दिवसापूर्वी काही प्रमुख मंत्री वर्षा बंगल्यावर आमच्यासोबत बसून पुढील काही योजनांवर चर्चा करत होते. दुसऱ्या दिवशी यातील गुलाबराव पाटील (Gulabrao Patil), दादाजी भुसे (Dadaji Bhuse) हे सर्व वरिष्ठ मंत्री अचानक गुवाहाटीला निघून गेले. गुलाबराव पाटील हे शिवसेनेतील सर्वात जुने नेते. त्यांची भाषणे ऐकली तर ते म्हणायचे, माझ्यासारख्या पानटपरी चालवणाऱ्याला शिवसेनेने कसं मोठं केलं. आमदार केलं. जिल्हा मंत्री बनवलं, राज्य मंत्री बनवलं, कॅबिनेट मंत्री केलं, हे महाशय स्वत:च सांगतात आणि पळून जातात. असं संजय राऊत म्हणाले.

16 जणांवर ईडीची कारवाई सुरु होती
संजय राऊत पुढे म्हणाले, हे जे आमदार आहेत त्यांतील 16 लोकांवर ईडीची कारवाई सुरु आहे.
आता मला माहिती नाही की, त्यांना कोणत्या वॉशिंग मशीन मध्ये टाकलं दिल्लीला नेहून… स्वच्छ केले आणि ते भाजपमय झाले.
त्यातील एका आमदाराने मला स्वत: फोन करुन सांगितलं. ते ठाण्यातील माझ्या जवळचे आमदार आहेत.
सकाळी मी त्यांना विचारलं कुठे आहेत तुम्ही, तर ते म्हणाले, मी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) कामासाठी आलो आहे.
मग मी विचारलं तुम्ही येत आहात का मुंबईला? तेव्हा ते म्हणाले, हो मी संध्याकाळी येतो.
तोपर्यंत काही आमदार सुरतला गेले होते. तीन वाजता त्यांचा मला फोन आला.
त्यांनी मला निरोप देण्यास सांगितलं की, ते भाजपमध्ये जात आहेत. त्यांची ईडीची केस क्लिअर केली.
देवेंद्र फडणवीस त्यांना अमित शाह (Amit Shah) यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांची केस क्लिअर झाली असा निरोप त्यांनी दिला.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut ed action against 16 shivsena mla cases

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sanjay Raut |  ‘…तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते’ – संजय राऊत

 

Maharashtra Political Crisis | ‘आम्ही सरकार पाडणार नाही, पण…’; रावसाहेब दानवेंनी स्पष्टच सांगितलं

 

Maharashtra Political Crisis | रात्रीच्या अंधारात शिंदे अन् फडणवीसांची भेट ? पुढील प्लान आखल्याची चर्चा