Sanjay Raut | ‘मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातं असावं’ ! गृहखात्यासाठी आता राऊतांचाही चंद्रकांत खैरेंच्या सुरात सूर!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sanjay Raut | राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या कामावर शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीकडे (NCP) असलेलं गृहखातं (Maharashtra Home Department) आपल्याकडे घ्यावं अशी मागणी शिवसेनेमधील नेते (Shivsena Leader) करत आहेत. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी उघडपणे इच्छा बोलून दाखवली. अशातच आता शिवसेनेचे खासदार आणि नेते यांनीही खैरेंच्या सुरात सूर मिसळत गृहखातं हे मुख्यमंत्र्यांकडेच असावं असं म्हटलं आहे. (Sanjay Raut)

 

मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातं असावं कारण त्याच्यामुळे राज्य हाकण्याला एक दिशा मिळते. मात्र हे जरी खरं असलं तरी एका पक्षाचं सरकार असताना हे शक्य होतं. मात्र आता तीन पक्षांचं सरकार सत्तेत आहे. हे सरकार बनवताना ज्या पद्धतीने वाटाघाटी ठरल्या होत्या त्याच पद्धतीने सरकार पुढे चालत असल्याचं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे. याआधीही राऊतांनी याबाबत एक सूचक वक्तव्य केलं होतं.

 

महाराष्ट्रातील (Maharashtra) गृहखात्याने कडक भूमिका घेण्याची गरज आहे.
कारण जर आपण आस्ते भूमिका घेत असाल तर गळ्याभोवती फास आवळला जात आहे.
आताच पाऊले उचलली नाहीत तर रोज एक खड्डा खणला जात आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, असं राऊत म्हणाले होते.

 

दरम्यान, राऊतांच्या या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादीकडून आता काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Web Title :- Sanjay Raut | Shivsena leader sanjay raut comment on maharashtra home ministry over discussion uddhav thackeray should take over the home department from ncp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | प्रशासकाच्या कार्यकाळातही महापालिकेच्या ‘वित्तिय समितीचे’ अस्तित्व कायम ! आयुक्तांनी पुढील आठवड्यात समितीच्या बैठकीचे केले आयोजन

 

PMC Gunthewari | पुणे महापालिकेने गुंठेवारीतील प्रस्ताव दाखल करण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढविली

 

Dr. Bharati Pawar | मास्क मुक्तीला केंद्राचा विरोध; राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्टच सांगितलं