Rajya Sabha Election | राज्यसभेसाठी संजय राऊतांचा ‘चौकार’ ! शिवसेनेकडून सलग चौथ्यांदा संधी; ‘या’ तारखेला भरणार अर्ज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Rajya Sabha election | राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यात रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. एकीकडे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत तर दुसरीकडे शिवसेनेकडून (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) यांची आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची तारीख ठरली आहे. शिवसेनेकडून सलग चार वेळा राज्यसभेची (Rajya Sabha Election) खासदारकी पटकावण्याचा रेकॉर्ड राऊतांच्या नावावर जमा झाला आहे.

 

संजय राऊत येत्या 26 मे रोजी विधानभवनात (Vidhan Bhavan) जाऊन राज्य सभेसाठी शिवसेना उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना नेता म्हणून चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर जाणार आहेत. यापूर्वी नजमा हेपतुल्ला (Najma Heptulla) महाराष्ट्रातून सलग 4 वेळा राज्यसभेवर (1980-2018) निवडून (Rajya Sabha Election) गेल्या आहेत. तर काँग्रेसकडून (Congress) सरोज खापर्डे (Saroj Khaparde) पाच वेळा राज्यसभेवर (1972-2000) निवडून गेले आहेत. संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

4 जुलैला हे खासदार निवृत्त होणार
राज्यसभेच्या द्वीवार्षिक निवडणुकीचा कार्य़क्रम जाहीर झाला आहे. देशभरातील 57 जागांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्रातील 6 जागांचा यामध्ये समावेश आहे. शिवसेनेचे संजय राऊत (Sanjay Raut), भाजपचे पीयूष गोयल (Piyush Goyal),
विकास महात्मे (Vikas Mahatme), विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahastrabuddhe), राष्ट्रवादीचे प्रफुल पटेल (Praful Patel)
आणि काँग्रेसचे पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांचा कार्यकाळ संपल्याने 6 जागांवर निवडणूक होत आहे.
राज्यातील बदलेल्या राजकीय स्थितीनुसार भाजपचे 2, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचा 1 उमेदवार विजयी होईल.
तर सहाव्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी भाजपकडे नाही.
त्यामुळे सहाव्या जागेवर संभाजीराजे छत्रपती यांनी दावा सांगितला आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena leader sanjay raut file nomination for rajya sabha on may 26

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Parbhani Crime | अवैध रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 1.30 कोटींचा मुद्देमाल जप्त

 

LIC Share Price | LIC च्या शेअरमध्ये 13% घसरण ! आता काय करावे गुंतवणुकदारांनी…होल्ड करावे की विकून बाहेर पडणे चांगले?

 

MNS on Thackeray Government | मनसेचा ठाकरे सरकारला जोरदार इशारा; म्हणाले – ‘आज तुमचे दिवस…उद्या आमचे येतील’