Sanjay Raut | ‘प्रियंका गांधी यांच्यात दिवंगत इंदिरा गांधी यांची झलक दिसते’ – शिवसेना खासदार संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Raut | लखीमपूर खेरी (lakhimpur kheri) घटनेने अजूनही देशातील वातावरण तापलेले आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी केंद्र आणि योगी सरकारवर (Yogi Government) टीकेची झोड उठवली. अखेर शनिवारी रात्री पोलिसांनी गृह राज्यमंत्री अमित मिश्रा टेनी (MoS Home amit mishra teni) यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अटक केली. प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांच्यामुळे या लढ्याला यश आले. या घटनेवरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनामधील आपल्या रोखठोक सदरात स्पष्ट भूमिका मांडली आहे. लखीमपूर खेरी प्रकरणात प्रियंका गांधी यांनी लढा उभारला त्यावेळी त्यांच्यामध्ये देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी (indira gandhi) यांची झलक दिसली, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

 

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना मंत्रीपुत्राने चिरडून मारले. सीबीआय (CBI), ईडीसारख्या (ED) तपास यंत्रणा कोणालाही अटक करत आहे. पण चार खून पचवून जगातला सर्वांत मोठा पक्ष हिंदुस्थानात सुखाने झोपला असताना त्याची झोप प्रियांका गांधी यांनी उडवली आहे. यानिमित्ताने इंदिराजींचे अस्तित्व पुन्हा दिसले. त्यांची झलक थेट प्रियांका गांधींमध्ये दिसते, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी लखीमपूर येथे प्रियंका गांधी निघाल्या असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अडवले. धक्काबुक्की केली. बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. इंदिरा गांधींच्या नातीला, राजीव गांधींच्या कन्येला भररात्री पोलिसांशी संघर्ष करताना देशाने पाहिले. ज्यांनी हा संघर्ष पहिला त्यांना इंदिरा गांधींचे देशात अस्तित्व आहे आणि ते जोपर्यंत आहे तोपर्यंत लोकशाही जिवंत राहील याची खात्री पटली असेल, असेही राऊत यांनी म्हंटले आहे.

 

हाथरस, लखीमपूर खेरी याठिकाणी राहुल आणि प्रियांका गांधी यांनी भूमिका घेतली त्यावरून प्रियांका गांधी इंदिराजींची प्रतिकृती आहेत की नाही,
हे येणारा काळच ठरवेल. सीतापूरच्या रस्त्यावर त्याची सुरुवात झाली असल्याचे प्रियंका गांधी यांनी दाखवून दिले आहे.
१९७७ साली इंदिरा गांधी आणि त्यांची काँग्रेस नको म्हणून विरोधक एकत्र आले आणि सत्ताधारी काँग्रेसचा पराभव केला.
सत्तेवर नसलेल्या काँग्रेसचेही इतर विरोधकांना वावडे व्हावे याचे आश्चर्य वाटते, असे रोखठोक सदरात संजय राऊत यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Sanjay Raut | shivsena mp sanjay raut criticized bjp and praise priyanka gandhi over lakhimpur kheri incident

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Index Testing In HIV | नागाव सेंट्रल आणि स्पेशल जेलमध्ये 85 कैदी HIV पॉझिटिव्ह आढळले, नशेच्या व्यसनामुळे झाले संक्रमित

Maharashtra Band | ‘महाविकास’ आघाडीनं पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला पुणे व्यापारी महासंघाचा पाठिंबा

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 77 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी