Sanjay Shirsat | ‘अडीच वर्षात पालकमंत्र्याने एक फोन केला नाही’ – संजय शिरसाट

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – Sanjay Shirsat | शिवसेनेत बंडखोरी करून स्वपक्षालाच सत्तेतून पायउतार होण्यास भाग पाडणारे शिंदे गटातील (Shinde Group) आमदार आता आपआपल्या मतदारसंघात परतले असून पक्षात कशाप्रकारे अन्याय सुरू होता, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) कशाप्रकारे दुजाभाव केला जात होता, हे उघडपणे सांगू लागले आहेत. काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, एकदम ओक्केच, या डायलॉगने राज्यभरात प्रसिद्ध झालेले सांगोल्याचे बंडखोर आमदार (Sangola Rebel MLA) शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्यापाठोपाठ आता औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी थेट पक्ष नेतृत्वासह शिवसेना नेते सुभाष देसाई (Shivsena Leader Subhash Desai) यांच्यावर तोफ डागली आहे.

 

औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आज आपल्या मतदारसंघात परतल्यानंतर बंडाचे कारण आणि राजकारण सांगताना म्हटले की, एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) नेतृत्त्वातील हा उठाव शिवसेना वाचविण्यासाठी होता. आम्हीच त्यांना हे बंड करायला लावले.

 

औरंगाबादचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यावर टिका करताना शिरसाट म्हणाले, माझ्या पालकमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात मला एक फोन नाही केला. माझ्या मतदारसंघात सोडा, पण माझ्या घराच्या बाजुला पालकमंत्री येतात आणि मला माहितीही होत नाही. माझ्या मतदारसंघासाठी 1 कोटीचा निधी आणि शेजारी गंगापूर मतदारसंघात 11 कोटींचा निधी मिळतो, हे कसे. हे मी तोंडी बोलत नसून रेकॉर्डवर सर्व आहे.

शिरसाट यांच्यासह औरंगाबादचे आणखी एक पैठणचे आमदार संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) आज सायंकाळी औरंगाबादमध्ये दाखल झाले.
विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पक्षाने आम्हाला मोठे केले, हे खरे.
मात्र, मी देखील थेट आमदार झालो नाही. पक्ष वाढीसाठी मी 35 वर्ष दिले आहेत.
लाठ्या काठ्या अंगावर झेलल्या. अनेक केसेस झाल्या. तरीही डगमगलो नाहीत.

 

म्हणाले, भुमरे बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) शिवसेनेमुळे मला सर्वकाही मिळाले.
माझ्यासारखा सामान्य शिवसैनिक मंत्री झाला. मंत्रिमंडळाबाबत ते म्हणाले, यावर अद्याप चर्चा झालेली नाही,  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व निर्णय घेतील.

 

Web Title :- Sanjay Shirsat | in two and a half years the guardian minister has not made a single call sanjay shirsat expressed grief

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Cabinet Expansion | शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारमध्ये कुणाचा वरचष्मा? कोणत्या अपक्ष आमदारांना लागणार मंत्रीपदाची लॉटरी; जाणून घ्या

 

 

Gulabrao Patil | शिवसेना वाचवण्यासाठीच आम्ही मंत्रीपदे सोडली – गुलाबराव पाटील

 

Pune Crime | पेट्रोल व डिझेल चोरी करणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड, 81 लाखाचा मुद्देमाल जप्त