‘स्टार डान्सर’ सपना चौधरीची ओढणी खेचत एकाने विचारलं ‘मुंह दिखाई का क्या लोगी ?’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – हरियाणवी डान्सर सपना चौधरीचं गाणं मुंह दिखाई सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या गाण्यात सपनाचा सुंदर आउटफिट दिसत आहे. या गाण्यात सपनाने घागरा आणि चोळी घातली आहे. एखाद्या नववधू सारखीच सपना सजली आहे. नेहमीप्रमाणे या गाण्यानेही सपनाने सर्वांना आपल्या ठुमक्यांनी डोलायला लावलं आहे. खास बात अशी की हे गाणं हरियाणवी आणि पंजाबी अशा मिक्स भाषेत आहे. अनेक लोकांनी या गाण्याला पसंती दर्शवली आहे.

गाण्यात दिसत आहे की, पतीवर सपना नाराज आहे. तिला मनवण्यासाठी तिचा जोडीदार तिला विचारत आहे, मुंह दिखाई का क्या लोगी ? या गाण्यात तिच्यासोबत विक्की काजला, राजू पंजाबी, अन्नू कादिया हेदेखील आहेत.

सपना चौधरी आपल्या प्रत्येक शोचा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करत असते ते देखील न विसरता. हेच कारण आहे की, तिच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत असतात.

Visit : boldnews24.com