Sapna Chaudhary | सपना चौधरीच्या ‘या’ गाण्याने केलं लोकांना वेडं, गाण्याच्या व्हिडीओला 47 करोडहून अधिक Views

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sapna Chaudhary | सपना चौधरी (Sapna Chaudhary) ही हरियाणाची शान आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली सपना चौधरी तिच्या नव्या आणि जुन्या गाण्यांमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या गाण्यांचा बोलबाला आहे. सपनाचे गाणी इंटरनेटवर व्हायरल होत असतात. तिचे गाणी सर्वांना प्रचंड आवडतात. मात्र सपनाचा असं एक गाणं आहे जे प्रत्येक पार्टीमध्ये वाजतं आणि लोक त्या गाण्यावर जोरदार नचतात. सपना चौधरीचा असाच एक व्हिडीओ युट्युबवर समोर आला आहे.

 

 

जर तुम्हीही सपना चौधरीचे (Sapna Chaudhary) गाणी ऐकले असतील तर ते गाणं तुमच्या आवडत्या यादीत नक्कीच समाविष्ट असेल. युट्युब वर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ‘तेरी आख्या का यो काजल’ (Teri Akhyan Ka Yo Kajal) असं या गाण्याचे बोल आहेत. सपना या गाण्यावर जबरदस्त डान्स करत असून समोर बसलेले प्रेक्षक टाळ्या वाजून तिचा उत्साह वाढवत आहे.

 

 

‘सोनटेक पंजाबी’ (Sonotek Punjabi) नावाच्या यूट्यूब चैनल वरुन सपनाचा हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हे गाणं डी सी मदाना यांनी गायले आहे. त्याचबरोबर गाण्याचे बोल वीर धैय्या यांनी लिहिले आहेत. तिचा हा डान्स परफॉर्मन्स पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. या व्हिडिओमध्ये अप्रतिम डान्स स्टेप्स करण्यात आले आहेत. सपनाच्या डान्स व्हिडीओला चाहत्यांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. तिचा डान्स व्हिडीओ आत्तापर्यंत 47 कोटीहून अधिक (47 Crore Plus) वेळा पाहिला गेला आहे.

 

सपना चौधरीच्या (Sapna Chaudhary) करिअरची सुरुवात स्टेजवर डान्स करून झाली.
मात्र बिग बॉस (Bigg Boss) मध्ये गेल्यानंतर ती अधिक प्रसिद्ध झाली.
बिग बॉस मध्ये आल्यापासून सपना चौधरीने उंची गाठली होती.
ती जिंकू शकली नाही मात्र तिथून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.
ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने फक्त हरियाणवी नाही तर पंजाबी आणि भोजपुरी गाण्यावर देखील डान्स केले आहेत.
सध्या सपना तिच्या अनेक प्रोजेक्ट मध्ये देखील व्यस्त आहे.

 

Web Title : Pune Crime | Loni Kalbhor Police station seize 4 two wheelers

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा