Sara Ali Khan | ‘ओरडू नका…’, सारा अली खानचा पापाराझींसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल

पोलीसनामा ऑनलाइन – बी- टाऊन मधील कायम चर्चेत असलेली अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही तिच्या पापाराझींसोबच्या वागणुकीमुळे नावाजली जाते. साराचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. त्यामुळे पापाराझी हे नेहमी तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी तयार असतात. अभिनेत्री सारा अली खान ही नेहमी पापाराझींना योग्य पद्धतीने वागणूक देताना दिसते. सध्या तिचा पापाराझींसोबतचा एक व्हिडिओ दिसत आहे. ज्यामध्ये ती पापाराझींना ‘ओरडू नका’ असे सांगत आहे.

अभिनेत्री सारा अली खान हिने ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केले.
(Sara Ali Khan Bollywood Debut) त्यानंतर ती कायमच चर्चेत राहिली आहे.
साराचे सर्वांसोबतचे नम्रपणे वागणे व तिचे गोड बोलणे यावर अनेक जण फिदा आहेत. नेहमीच ती पापाराझींसोबत नम्रपणे बोलताना पोझ देताना दिसून येते. सारा अली खान नेहमी कूल अंदाजात दिसून येते.( Sara Ali Khan With paparazzi) नुकतेच तिला एका रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट करण्यात आले. यावेळी सारा अली खानने रेड कलरचा सुट, त्यावर झुमके व रेड कलरच्या बांगड्या अशा देसी लूक मध्ये दिसली.  यावेळी साराला पाहताच सर्व पापाराझी तिच्या फोटोसाठी बोलू लागले. त्यानंतर साराने त्यांना क्युट अशी पोज देखील दिली. त्यानंतर पुन्हा पापाराझी साराला फोटो काढण्यासाठी आवाज देत होते. त्यामुळे हॉटेलमध्ये आलेले इतर लोक बघू लागले. त्यामुळे सारा अली खान पुन्हा मागे वळून नम्रपणे पापाराझींना “ओरडू नका, रेस्टॉरंटमधले लोक बघत आहेत.” असे सांगते.

पापाराझींसोबतचे सारा अली खानचे  वागणे नेटकऱ्यांना आवडले असून सर्वजण तिचे कौतुक करत आहेत.
या व्हिडिओला नेटकऱ्यांनी कमेंट करत लिहिले आहे की, ‘ती खूप नम्र आहे. तिला अजिबात अहंकार नाहीये.’ अभिनेत्री सारा अली खान
ही तिच्या चित्रपटांमुळे (Sara Ali Khan Movies) व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. पदार्पणानंतर अनेक सिनेमांमध्ये तिने
आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली आहे. सुशांत सिग रजपूत (Sushant Singh Rajput), रणवीर सिंग (Ranveer Singh),
कार्तिक आर्यन (Kartik Aaryan), वरुण धवन (Varun Dhawan),विकी कौशल (Vicky Kaushal) अशा अनेक अभिनेत्यासोंबत
सारा अली खानने स्क्रीन शेअर केली आहे. तिचे नाव आधी अभिनेता कार्तिक आर्यन सोबत जोडले गेले (Sara Ali Khan Affair) आता
तिचे नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत (Sara And Shubman Gill) जोडले जात आहे.

Web Title :   Sara Ali Khan | sara ali khan says chilao mat as paparazzi scream video viral on social media

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | समाज माध्यमांवर घातक शस्त्रांचा फोटो ठेऊन दहशत निर्माण करणार्‍यांना गुन्हे शाखेकडून अटक

Uddhav Thackeray | ‘माझा ‘कलंक’ शब्द एवढा प्रभावी आहे असं वाटलं नव्हतं’, उद्धव ठाकरेंचा भाजपवर पुन्हा हल्लाबोल; म्हणाले-‘मी जे म्हटलं ते योग्यच!’ (व्हिडिओ)

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज, देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला (व्हिडिओ)

Uddhav Thackeray | शिंदे गटाच्या आमदारांसाठी ‘मातोश्री’ची दारं खुली आहेत का?, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले… (व्हिडिओ)