SAIL Recruitment : स्टील अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये भरती सुरु, मुलाखतीमधून होणार निवड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने (SAIL) प्रशिक्षणार्थी पदांवर भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. दुर्गापूर स्टील प्लांटच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही भरती करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवार संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पद संख्या :
सेल भरती 2020 अंतर्गत दुर्गापूर स्टील प्लांटच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थींची 82 पदं भरली जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता :
दुर्गापूर स्टील प्लांटच्या मल्टि-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या प्रशिक्षणार्थी पदांसाठी केवळ योग्य व पात्र नर्सच अर्ज करू शकतात. प्रशिक्षणार्थी पदावर अर्ज करण्यासाठी उमेदवाराची बी.एससी (नर्सिंग) पदवी असणे आवश्यक आहे. यासह त्यांच्याकडे इंटर्नशिप प्रमाणपत्रही असले पाहिजे.

वय मर्यादा :
या भरतीसाठी अर्जदाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 30 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.

निवड प्रक्रिया :
दुर्गापूर स्टील प्लांटच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थींच्या पदांवर भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, तर त्यांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.

प्रशिक्षण वेळ आणि पगार :
सेल भरती 2020 अंतर्गत दुर्गापूर स्टील प्लांटच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये या भरतीसाठी 18 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान दरमहा 8000 रुपये दिले जातील.

अर्ज कसा करावा :
इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 सप्टेंबर 2020 आहे. अधिक माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.