२० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच जाळ्यात

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – जमीनीचे ना हरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्ह्यातील हत्तूर गावच्या सरपंचाला अँटी करप्शनच्या पथकाने रंगेहात पकडले.

धर्मराज गोपाळ राठोड (वय ४६ पद – सरपंच, हत्तुर गाव, रा हत्तुर, ता दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ६१ वर्षीय तक्रारदाराने अन्टी करप्शनकडे तक्रार केली आहे.

तक्रारदार यांची हत्तुर गाव शिवारात बिगरशेती प्लॉट आहे. त्यांना त्याचा व्यावसायिक हेतूसाठी वापर कारायचा होता. त्यावेळी त्यांनी नाहरकत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी सरपंच राठोड याने त्यांना २० हजार रुपयांची मागणी केली. त्यांनी यासंदर्भात अँटी करप्शनकडे तक्रार केली. त्यानंतर अँटी करप्शनच्या पथकाने त्याला सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like