Satara Crime News | खळबळजनक! घरात आढळले एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह, आई-वडील, भाऊ-बहिणीचा समावेश

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime News | सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबूर येथे शुक्रवारी (दि.21) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून (Dead Bodies Found) आले आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई (Mother), वडील (Father), भाऊ (Brother), बहिण (Sister) यांचा समावेश आहे. घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थळी दाखल झाले आहेत. (Satara Crime News)

आनंदा पांडुरंग जाधव Ananda Pandurang Jadhav (वय-75), सुनंदा आनंदराव जाधव Sunanda Anandrao Jadhav (वय-65), मुलगा संतोष जाधव Santosh Jadhav (वय-45), मुलगी पुष्पा प्रकाश धस Pushpa Prakash Dhas (रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) अशी मृतांची नावे आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत फोन करुनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आनंदा जाधव यांच्या एका जवळच्या नातेवाईकाने संबंधितांच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घराचा दरवाजा आतून बंद होता.(Satara Crime News)

नातेवाईक आणि ग्रामस्थांनी जाधव यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील चौघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आनंदा जाधव हे काही दिवसांपासून आजारी होते. कराड येथे उपचार करुन आल्यानंतर गुरुवारी रात्री घरात सर्वजण एकत्र होते. घरामध्ये ऑक्सिजनची सुविधा करण्यात आली होती. गुरुवारी रात्री मुलगी पुष्पा धस यांच्या मुलाने फोन करुन आजोबांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. सणबुर मधील घटना घडली ते घर एका आडबाजूला आहे.

Satara Crime News

या घटनेचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला पाठवले आहेत.
शवविच्छेदनानंतर मृत्यूचे कारण समजेल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Pune Crime News | ‘नासा’ला द्रव्य विकण्याच्या नावाखाली घेतलेले पैसे परत मागितल्याने ज्येष्ठ नागरिकांना घरात शिरुन मारहाण

Maharashtra Rain Update | कोकणासह विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन; हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Monsoon Session | मणिपूर घटनेचे पडसाद महाराष्ट्र विधिमंडळात, अध्यक्षांनी चर्चा नाकारल्याने विरोधकांचा सभात्याग (व्हिडिओ)

Pune Police MCOCA Action | गंभीर गुन्हे करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा म्होरक्या अमोल शेलारसह 4 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 38 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

Raigad Irshalwadi Landslide: Death toll rises to 16, several missing