Satara Crime | नीरा नदीमध्ये आढळलेला मृतदेह धनकवडीतील तरुणीचा, घातपात की आत्महत्या?

शिरवळ/सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – Satara Crime | नीरा नदीमध्ये (Neera River) एका तरुणीचा मृतदेह (Dead Body) आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यात शिरवळ पोलिसांना (Shirwal Police) यश आले आहे. मृत तरुणी ही पुण्यातील धनकवडी (Dhankawadi) परिसरातील आहे. नेहा शरद पिलाणे Neha Sharad Pilane (वय-20 रा. वांगणी, ता. वेल्हा सध्या रा. जयनाथ चौक, धनकवडी, पुणे) असे या मृत तरुणीचे नाव आहे. नेहा पिलाणे या तरुणीने आत्महत्या (Suicide) केली की घातपात झाला याचा तपास शिरवळ पोलीस (Satara Crime) करीत आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथील नीरा नदीपात्रात रविवारी (दि.15) मकरसंक्रांतीच्या दिवशी एका तरुणीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यात (Shirwal Police Station) अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शिरवळ पोलिसांनी तरुणीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करुन 72 तासात तरुणीची ओळख पटवली आहे. (Satara Crime)

 

शिरवळ पोलीस ठाण्यातील पोलीस तरुणीची ओळख पटवण्याचे काम करत असताना ही तरुणी पुणे शहरातील असल्याची माहिती मिळाली.
तसेच तिचे नाव नेहा पिलाणे असून ती बेपत्ता झाली होती.
यासंदर्भात पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.

 

शिरवळ पोलिसांनी याबाबत नातेवाईकांशी संपर्क साधला असता मृतदेह नेहा पिलाणे हिचा असल्याचे स्पष झाले.
त्यानंतर पोलिसांनी नेहाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
नेहाने आत्महत्या केली की घातपात आहे याचा तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Satara Crime | the dead body found in the neera river is that of a young woman from pune investigation started by the police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…