Satara News : धक्कादायक ! भोंदू बाबामुळे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू, दोघांना अटक

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भोंदू बाबामुळे एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याप्रकरणी सातारा जिल्ह्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. दहिवडी येथील शिंदी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

उत्तम अवघडे आणि रामचंद्र अवघडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात कुटुंबाचे कोणतेही सहकार्य होत नसल्याने अंनिसने गुन्हा दाखल केला.

मिळालेल्या माहितीनुसार, एका 14 वर्षाच्या मुलीला ताप आल्यानंतर आई-वडिलांनी तिला गोंदवले येथील देवऋषाकडे जाऊन उपचार केले होते. यावेळी मुलीला भुतबाधा झाल्याचे देवऋषींनी सांगितले होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने गेल्या आठवड्यात सदर मुलीचा मृत्य झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्युनंतर आई-वडिलांनी मुलीचा मृतदेह परस्पर दहिवडी येथे पुरला. या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर गुरुवारी (दि. 25) रात्री उशिरा हा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात मुलीचे नातेवाईक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. याची सखोल चौकशीची मागणी अंनिसने केली आहे.