SBI च्या कोटयावधी ग्राहकांना मोठा ‘झटका’ ! महिन्याभराच्या आतच FD वरील व्याजदरात पुन्हा ‘घट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – महिन्याच्या आत भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने पुन्हा फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) वरील व्याजदर घटवले आहेत. बँकने 45 दिवसांच्या कालावधीच्या शॉर्ट टर्म एफडीच्या व्याजात 0.50% ची कपात केली आहे, जी 10 मार्चपासून लागू आहे.

नव्या दरानुसार, 7 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज मिळेल, जो यापूर्वी 4.50 टक्के होता. याशिवाय, एक वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी एफडीच्या व्याज दरात 0.10 टक्क्यांची कपात केली गेली आहे. यावर अगोदर 6 टक्के व्याज मिळत होते. फेब्रुवारीमध्ये सुद्धा बँकेने एफडीच्या दरात 10 ते 50 बीपीएसची कपात केली होती.

कालावधी सध्याचा दर नवे दर सीनियर सिटिझनसाठीचे सध्याचे दर सीनियर सिटिझनसाठी नवे दर
7 ते 45 दिवस 4.5% 4% 5% 4.5%
46 ते 179 दिवस 5% 5% 5.5% 5.5%
180 ते 210 दिवस 5.5% 5.5% 6% 6%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी 5.5% 5.5% 6% 6%
1 वर्षापासून 2 वर्षाखाली 6% 5.9% 6.5% 6.4%
2 वर्षापासून 3 वर्षापेक्षा कमी 6% 5.9% 6.5% 6.4%
3 वर्षापासून 5 वर्षापेक्षा कमी 6% 5.9% 6.5% 6.4%
5 ते 10 वर्षापर्यंत 6% 5.9% 6.5% 6.4%

बँकेने 46 ते 179 दिवस, 180 ते 210 दिवस आणि 211 दिवसांपासून एक वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी एफडी व्याजात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बँकने एमसीएलआरमध्ये सुद्धा 15 बीपीएसची कपात केली आहे.

एसबीआय पेन्शनर्स आणि स्टाफला मिळतो हा फायदा
जर तुम्ही एसबीआयचे स्टाफ मेंबर आहात किंवा पेन्शनर असाल तर तुम्हाला फिक्स्ड अकाऊंटमध्ये जमा रक्कमेवर वरील सांगितलेल्या व्याज दरापेक्षा 1 टक्का जास्त व्याज मिळेल. जर तुम्ही एसबीआय स्टाफसह सीनियर सिटिझनसुद्धा असाल तर तुम्हाला 1 टक्के व्याजासह 0.50 टक्के व्याज, असा दोन्हीचा फायदा मिळेल.