Sayaji Hotels | सयाजीचा होतोय महाराष्ट्रभर विस्तार औरंगाबादमध्ये नवीन एनराईज हॉटेल सुरू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन  – Sayaji Hotels | सर्वोत्कृष्ट  चव आणि आपल्या सेवेने ग्राहकांना समाधानी करणाऱ्या सयाजी ग्रुप ऑफ हॉटेल्सचा (Sayaji Group Of Hotels) आता राज्यभर विस्तार होत आहे. राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादमध्ये सयाजीने (Aurangabad) आपले नवीन एनराईज (Enrise By Sayaji Aurangabad) हे हॉटेल सुरू केले आहे. जळगाव रोड येथे मध्यवर्ती ठिकाणी, एसबीओए शाळेसमोर, मयूर पार्क येथे हे हॉटेल आहे. हे लोकेशन रस्ते, रेल्वे आणि हवाई मार्गाने चांगल्या प्रकारे जोडलेले आहे. तसेच युनेस्कोचे जागतिक वारसा असलेली स्थळे अजिंठा, एलोरा लेणी, पानचक्की  आणि बीबी-का-मकबरा अशी पर्यटन स्थळे अगदी जवळ आहेत. (Sayaji Hotels)

औरंगाबादमधील सयाजीच्या एनराईजमध्ये २४ भव्य आणि ३२ आलिशान रुम आहेत. त्यासह ८ क्लब रुम आहेत . हे सर्व रुम आधुनिक सुविधांसह डिझाइन केलेल्या आहेत. प्रत्येक खोल्या वातानुकूलित आणि किंग आणि क्वीन आकाराच्या बेडने सज्ज आहेत. चहा-कॉफी मेकर, एक मिनी बार, वॉर्डरोब, वाय-फाय कनेक्टिव्हिटी, एलईडी टीव्ही आणि वैयक्तिक लाँकर अशा सुविधा या रुममध्ये आहेत. हॉटेलमधील सुविधांमध्ये २४ तास रूम सर्व्हिस, ट्रॅव्हल डेस्क, विशेष रेस्टॉरंट्स आणि बँक्वेंट हॉल देखील आहे.हॉटेलमध्ये एकूण ३ बँक्वेंट हाँल आहेत. जे १५० ते ४०० पाहुण्यांचा पाहुणचार करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. जे खाजगी कार्यक्रम, कॉर्पोरेट मीटिंगसाठी आणि इतर क्षणांसाठी वापरता येवू शकतात . हॉटेलमधील मोमेंट हे मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट बुफे, भारतीय, कॉन्टिनेंटल आणि थाई खाद्यपदार्थ उपलब्ध करेल.  आणि विशेष बाब म्हणजे हे हॉटेल पूर्णतः शुद्ध शाकाहारी  (प्युअर व्हेज ) आहे. (Sayaji Hotels)

सयाजी हॉटेल्स हा भारतातील प्रीमियर अपस्केल लाइफस्टाइल हॉस्पिटॅलिटी ब्रँड आहे. जो त्यांच्या चांगला अनुभव, आदरातिथ्य आणि समृद्धीसाठी प्रसिद्ध आहे. ४-स्टार आणि ५-स्टार हॉटेल श्रेणीत सयाजी हॉटेलने नवीन मानके स्थापन केली आहेत. सयाजी हॉटेल्स, सयाजी एफोटेल आणि सयाजी एनराईज या ब्रँड नावाखाली समूह सध्या १३ हाँटेल चालवत आहे .प्रत्येक हॉटेल हे भरपूर मेजवानी आणि अन्न आणि पेय सेवा (फुड अँड ब्रेव्हरेज) सुविधांसह आलिशान खोल्या आहेत.

नवीन हॉटेलबाबत सयाजी एनराईजचे मालक मनोज दरक म्हणाले की सयाजी या प्रसिद्ध आणि  यशस्वी ब्रँडशी जोडले गेल्याचा आम्हाला खूप अभिमान आणि आनंद आहे. सयाजी एनराईजच्या माध्यमातून आम्ही औरंगाबादच्या जनतेला व तेथे येणाऱ्या पर्यटकांना सर्वोत्तम सेवा देऊ, असा विश्वास आम्हाला आहे. अत्यंत मोक्याचे ठिकाण, सुबकपणे तयार केलेली सजावट, चवदार मेजवानी आणि आदरातिथ्य यामुळे हे हॉटेल औरंगाबादमधील पर्यटक आणि व्यावसायिक प्रवाशांना नक्कीच आकर्षित करेल.

सयाजी हॉटेल्सचे व्यवस्थापकीय संचालक रऊफ धनानी म्हणाले की आम्ही अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये सेवा देत आहोत.
या सेवेचा आम्हाला  अभिमान आहे. औरंगाबादमध्ये आमच्या ब्रँडचे अनावरण हे माझ्या मते प्रत्येक दिवसाचे प्रत्येक पैलू महत्त्वाचे बनवेल.
आमच्याकडे आलेल्या ग्राहकाचा प्रत्येक क्षण संस्मरणीय अनुभव देईल हे आमचे काम आहे.

Web Title : Sayaji Hotels | Enrise By Sayaji Aurangabad Sayaji Group Of Hotels

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन