फायद्याची गोष्ट ! SBI देईल दरमहा नियमित पेन्शन, जाणून घ्या ‘या’ स्कीम बाबत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरी करणाऱ्या व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतरच्या खर्चासाठी दरमहा निश्चित पेन्शन हवी असते. जी कोणत्याही व्यक्तीची मूलभूत गरज आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची अ‍ॅन्यूटी डिपॉझिट योजना याच संबंधित योजना आहे. या योजनेंतर्गत तुम्हाला मुदतीच्या कालावधीसाठी एकरकमी रक्कम द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला ईएमआय प्रमाणे दरमहा निश्चित रक्कम मिळू शकते. दरमहा प्राप्त झालेल्या रकमेमध्ये मूळ रकमेचा एक भाग आणि व्याजाचा समावेश असतो. व्याज तिमाही आधारावर मोजले जाईल आणि मासिक मूल्यामधून वजा केले जाईल.

ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना निवृत्तीनंतर दरमहा त्यांच्या बचतीमधून नियमित उत्पन्न हवे आहे. आपण ज्या तारखेला ही रक्कम जमा केली त्याच तारखेला आपल्याला दरमहा एक निश्चित रक्कम मिळेल. जर आपण 29, 30 किंवा 31 रोजी पैसे जमा केले असतील आणि पुढील महिन्यात यापैकी कोणतीही तारीख नसेल तर पुढील महिन्याच्या पहिल्या तारखेला आपल्याला पेन्शनची रक्कम दिली जाईल.

SBI अ‍ॅन्यूटी डिपॉझिट योजनेशी संबंधित काही महत्वाच्या गोष्टी :

1. ठेव कालावधी: ही ठेव योजना 36 महिने / 60 महिने / 84 महिने किंवा 120 महिन्यांसाठी उपलब्ध आहे. आपले मासिक उत्पन्न कालावधी आणि ठेवीच्या मुख्य रकमेवर अवलंबून असेल.

2. एवढी रक्कम जमा करू शकता : दरमहा तुम्हाला किती रक्कम हवी आहे यावर ते अवलंबून असते. जर तुम्हाला 60 वर्षासाठी दरमहा 5000 रुपये मासिक उत्पन्न हवे असेल तर आपल्याला किती रक्कम जमा करावी लागेल, यासंबंधित माहिती आपल्याला बँक देईल. दरम्यान, ठेवीची रक्कम 25,000 रुपयांपेक्षा कमी नसावी. तर, त्याची कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.

3. व्याज दर : अ‍ॅन्यूटी ठेवीवरील व्याज समान मॅच्युरिटी मुदत ठेवीनुसार जमा केले जाते. एसबीआयच्या वेबसाइटनुसार बँक सध्या एका वर्षापासून ते दहा वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 6 टक्के व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना सामान्य लोकांपेक्षा 0.5 टक्के अधिक म्हणजे 6.5 टक्के व्याज मिळेल. एसबीआय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे व्याज दर सात टक्के आहे.

4. अकाली पैसे काढणे : एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटनुसार ठेवीदाराच्या मृत्यूनंतरच ठराविक मुदतीपूर्वी रक्कम काढता येते.

5. इतर सुविधा : या योजनेत नामनिर्देशन सुविधा उपलब्ध आहे. अ‍ॅन्यूटीमध्ये जमा केलेल्या रकमेच्या 75 टक्के बरोबर रक्कम ओव्हरड्राफ्ट आणि कर्जाची सुविधा ठेवीदाराला घेता येते.