कामाची गोष्ट ! ‘या’ तारखेपासून पासून बदलणार SBI, ICICI आणि HDFC बँकेच्या ATM मधून पैसे काढण्याचे नियम, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 16 मार्च 2020 पासून पूर्ण देशामध्ये एटीएम मधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये बदल होणार आहे. RBI ने दिलेल्या माहितीनुसार डेबिट कार्ड म्हणजेच एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे होणारे व्यवहार अजून सोपे करण्यासाठी नवीन नियम आणण्यात आले आहे. खात्यातील पैसे सुरक्षित राहावे हा देखील या मागचा हेतू आहे.

या आधी देखील एसबीआयने एटीएम संदर्भातील नियमांमध्ये बदल केले होते. आता एसबीआयने एटीएमद्वारे वन टाइम पासवर्डच्या साहाय्याने कॅश विड्रॉल सिस्टीम सुरु केली आहे. यानुसार रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत एटीएम मधून कॅश काढण्यासाठी तुम्हाला रजिस्टर मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी टाकावा लागेल. हा नियम दहा हजारांपेक्षा अधिकच्या व्यवहारांसाठी लागू आहे.

जाणून घेऊयात 16 मार्च 2020 पासून RBI कोणते नवीन नियम लागू करणार

1) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांना सांगितले आहे की, देशातील एटीएम आणि पीओएस टर्मिनल्सवर फक्त कार्ड जारी / पुनर्प्रक्रियेच्या वेळीच व्यवहार मंजूर करण्यास सांगितले आहे, ज्यांचे परदेशात येणे जाणे होत नाही त्यांच्या बँक कार्डवर परदेशी सुविधा उपलब्ध होणार नाही. आता या सेवा बँकेत अर्ज केल्यानंतरच सुरू होतील. आतापर्यंत बँका या सर्व सेवा विना मागणी सुरू करतात.

जर ग्राहकास परदेशातील व्यवहार, ऑनलाइन व्यवहार आणि संपर्कविहीन व्यवहाराची सेवा आवश्यक असेल तर त्याला या सुविधा स्वतंत्रपणे आपल्या कार्डावर घ्याव्या लागतील. म्हणजेच परदेशात ऑनलाइन किंवा संपर्क रहित व्यवहाराची सुविधा हवी असेल तर आपल्याला ही सेवा स्वतंत्रपणे घ्यावी लागेल.

2) ज्यांच्याकडे सध्या कार्ड आहे ते त्यांच्या जोखमीच्या आधारे निर्णय घेतील की त्यांना त्यांच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कार्ड व्यवहार बंद करायचे आहेत किंवा नाहीत म्हणजेच, आपण इच्छित असल्यास, आपण आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड डिसेबल देखील करू शकता. ज्या कार्ड्समध्ये अद्याप ऑनलाइन / आंतरराष्ट्रीय / संपर्कविरहित व्यवहार झाले नाहीत अशा कार्डमध्ये ही सुविधा बंद करणे बंधनकारक असेल.

3) ग्राहकांना चोवीस तास सात दिवस कोणत्याही वेळी आपल्या कार्डला ऑन ऑफ करता येणार आहे. किंवा व्यवहार लिमिटमध्ये बदल करता येणार आहेत. यासाठी ते मोबाइल अँप किंवा ऑनलाइन बँकिंग वापरू शकतात.

4) बँक आता आपल्या ग्राहकांना पीओएस/एटीएम/ऑनलाइन ट्रांजेक्शंस/कॉन्टेक्टलेस ट्रांजेक्शंससाठी घरगुती आणि विदेशी दोनीहीसाठी बदल करण्याची सुविधा द्यावी लागणार आहे. याचप्रमाणे बँकांना कार्ड स्विच ऑन ऑफ करण्याची सुविधा देखील द्यावी लागणार आहे.

5) नवीन नियम प्रीपेड गिफ्ट कार्ड्स आणि मेट्रो कार्डवर लागू होणार नाहीत.