44 कोटी SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! उद्यापासून 3 दिवस ‘या’ वेळेत करू शकणार नाही पैशांचा व्यवहार; जाणून घ्या का?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – SBI | स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) मध्ये खाते असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांना अ‍ॅलर्ट केले आहे की, उद्यापासून तीन दिवस काही तासांसाठी बँकेच्या विशेष सेवा काम करणार नाही. बँकेने ट्विट करत ग्राहकांना ही माहिती दिली (SBI) आहे.

 

 

एसबीआयने ट्विटरवर म्हटले की, सिस्टम मेंटनन्समुळे 09, 10 आणि 11 ऑक्टोबरला बँकेच्या काही सेवा बंद राहतील. या सेवांमध्ये इंटरनेट बँकिंग, Yono, Yono Lite, UPI चा समावेश आहे. बँकेला काही डिजिटल सेवा अपग्रेड करायच्या असल्याने ही असुविधा होणार आहे.

 

 

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1446078719622217735?ref_src=twsrc%5Etfw

 

 

या वेळेत ग्राहक करू शकणार नाहीत व्यवहार

SBI ने ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, या सेवा 09 ऑक्टोबरच्या रात्री 12:20 ते 02:20 पर्यंत बंद राहतील. 10 आणि 11 ऑक्टोबरला रात्री 11:20 पासून 1:20 पर्यंत या सेवा उपलब्ध नसतील.

एसबीआयने म्हटले आहे की, बँक आपला युपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करत असल्याने या दरम्यान ग्राहकांना युपीआय ट्रांजक्शन बंद राहतील.

 

3.45 कोटी लोक करत आहेत वापर

सध्या एसबीआयमध्ये योनोचे 3.45 कोटी रजिस्टर्ड यूजर्स आहेत आणि यावर दरदिवशी सुमारे 90 लाख लॉग इन होतात. डिसेंबर 2020 तिमाहीत एसबीआयने 15 लाखापेक्षा जास्त खाती योनोद्वारे उघडली आहेत.

 

Web Title : SBI | sbi online banking services are not available for next 3 days in this time check

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update