आर्थिकमहत्वाच्या बातम्यामुंबई

SBI Tax Saving Scheme | एसबीआयमध्ये 5 लाख गुंतवा अन् मॅच्युरिटीनंतर मिळवा 6.53 लाख रुपये; जाणून घ्या इतर सवलत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – SBI Tax Saving Scheme | देशातील सर्वात मोठी असणारी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) आहे. SBI आपल्या कोट्यावधी ग्राहकांसाठी अनेक योजना राबवत असते. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अनेक सुचना देखील वेळोवेळी देत असते. दरम्यान, SBI ने आता बचतीचा पर्याय समोर आणला आहे.
त्यामुळे निश्चित उत्पन्नासह कर बचतीचा (SBI Tax Saving Scheme) पर्याय हवा असेल तर SBI च्या कर बचत FD योजनेत गुंतवणूक करू शकणार आहात.

 

SBI च्या या योजनेमध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80C (Income Tax Section 80C) अंतर्गत कर कपातीचा दावा केला जाऊ शकतो. टॅक्स सेव्हिंग एफडीचा लॉक-इन कालावधी पाच वर्षांचा असतो. यामुळे पगारदार कर्मचाऱ्यांसाठी हा सुरक्षित पर्याय सांगितला जात आहे. दरम्यान, SBI च्या कर बचत FD योजनेत गुंतवणूक केल्याने परिपक्वतेवर परतावा करपात्र आहे. तसेच, किमान 1 हजार रुपये भरुन खाते सुरु करता येते. यात कोणतीही कमाल ठेव मर्यादा नसणार आहे. (SBI Tax Saving Scheme)

5 लाख ठेवीवर 1.53 लाख व्याज –
यामध्ये नियमित ग्राहकांना पाच वर्षांच्या मुदत ठेवींवर 5.40 टक्के वार्षिक व्याज देत आहे. समजा जर तुम्ही पाच लाख रुपयांची FD केली तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 6,53,800 रुपये मिळतील. यात तुम्हाला व्याजातून 1,53,800 रुपये उत्पन्न मिळणार आहे. SBI मुदत ठेवीवरील व्याज तिमाही आधारावर चक्रवाढ होते.

 

दरम्यान, ज्येष्ठ नागरिकास (Senior Citizen) FD व्याज दर वार्षिक 6.20 टक्के असणार आहे.
समजा जर तुम्ही पाच लाख रुपये (Five lakh rupees) जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला 6,80,093 रुपये मिळतील.
यात व्याजेच्या माध्यमातून 1,80,093 रुपये उत्पन्न मिळणार आहे.
SBI त्यांच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षे अथवा त्याहून जादा कालावधीच्या FD साठी SBI Wecare ठेव योजना चालवत आहे.

 

त्याचबरोबर यात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या 0.50 टक्के अतिरिक्त व्याजाच्या शिवाय 0.30 टक्के जादा व्याज उपलब्ध आहे.
अर्थात जर तुम्ही पाच वर्षांसाठी FD केली असेल तर तुम्हाला 6.2 टक्के वार्षिक व्याज मिळणार आहे.
तसेच, SBI WeCare ठेव योजनेचा लाभ फक्त 31 मार्च 2022 पर्यंत मिळू शकणार आहे.

 

Web Title :- SBI Tax Saving Scheme | sbi scheme deposit 5 lakhs you will get 6 lakh 53 thousand on maturity with the benefit of tax exemption

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा


 

 

 

Back to top button