SBI ची ऑनलाइन सुविधा ठप्प, केवळ ATM अ‍ॅक्टीव्ह

पोलीसनामा ऑनलाइन – काही तांत्रिक कारणास्तव भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाची (SBI) ऑनलाइन सेवा मागील काही तासांपासून बंद झाली आहे. यासंदर्भात बँकेने ट्विट करत आपल्या ग्राहकांना याची माहिती सांगितली आहे. तथापि, SBI चे एटीएम मशीन या समस्येपासून लांब आहेत.

ट्विट करत बँकेने म्हटले की, ‘आम्ही ग्राहकांना विनंती करत आहोत की त्यांनी आमच्यासोबत राहावे. लवकरच सामान्य सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल. कनेक्टिव्हिटी नसल्याने आमच्या कोअर बँकिंग सेवा ग्राहकांना वापरता येणार नाहीत. एटीएम आणि पीओएस सुरळीत सुरु आहेत. उर्वरित सेवा बंद आहेत,’ असे त्यांनी सांगितले आहे.

४४ कोटी ग्राहक

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे तब्बल ४४ कोटी ग्राहक आहेत. ही संख्या पाहता ग्राहकांना त्रास होणार आहे. या बँकेचा बाजारातील जवळपास हिस्सा २५ टक्के इतका आहे. तद्वतच बँकेच्या देशात २४ हजार शाखा आहेत. एटीएमची संख्या सुद्धा काही लाखांमध्ये आहे. अलीकडेच स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी दिनेश खारा यांची नियुक्ती झाली आहे. पदभार स्वीकारताना त्यांनी ग्राहकाभीमुख सेवा आणि सुरक्षा देणार असल्याचे म्हणाले.