संतापजनक ! गतीमंद मुलींसोबतचे अश्लील चाळे व्हायरल करणार्‍या स्कुल व्हॅनचालकाला अटक

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विशेष मुलांच्या शाळेतील गतीमंद मुलींसोबत दोन साथीदारांसह अश्लिल चाळे करणाऱ्या व त्याची व्हिडिओ क्लीप व्हायरल करणाऱ्या व्हॅनचालकाला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली असून तसेच त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अविनाश कैलास शेजूळ (वय १९, रा वाळुज) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन दोन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही घटना १५ जानेवारी रोजी घडली होती. वाळुज परिसरात वळदगाव येथील विशेष मुलांच्या शाळेतील मुलांची व्हॅनमधून तो ने आण करण्याचे काम करतो. १५ जानेवारी रोजी सायंकाळी वाळुंज परिसरातील विशेष मुली, मुलांना घेऊन जात असताना त्याने काही मुलींसोबत अश्लील चाळे केले. त्याने त्याच्या दोन साथीदारांना व्हॅनमध्ये बसवून घेतले. व्हॅन उभी केल्यानंतर अविनाश आणि त्याच्या मित्रांने मुलीला दोघांमध्ये बसविले आणि तिच्यासोबत अश्लिल वर्तन सुरु केले.

आरोपीच्या अन्य साथीदारांनी मोबाईलवर व्हिडिओ तयार केला. ही क्लिप अविनाशने त्याच्या व्हॉटसअ‍ॅपच्या स्टेटसवर अपलोड केली. तर अन्य तरुणांनी सोशल मिडियावर व्हायरल केली. आरोपी तिच्यासोबत अश्लिल वर्तन करीत असताना ती मुलगी भितीने ओरडत होती. मात्र ते तिला सोडत नव्हते. ही क्लिप पाहून वाळुज परिसरातील दोन तरुणांनी या घटनेची माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांला सांगितली. त्यांनी या मुलीच्या पालकांना बोलावून त्यांना याची माहिती दिली.

शनिवारी हा प्रकार समोर आला. त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने व्हॅनचालकाला अटक केली आहे. आरोपींनी व्हायरल केलेली व्हिडिओ क्लिप पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like