Sciatica Symptoms | कमरेपासून पायांपर्यंत होत असतील वेदना तर असू शकतो सायटिका, जाणून घ्या लक्षणे आणि बचाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Sciatica Symptoms | सायटिका ही शरीरातील सर्वात मोठी नस (Nerve) आहे जी पाठीच्या कण्यापासून पायांपर्यंत पसरलेली आहे. सायटिका (Sciatica) झाल्यास वेदना हळूहळू होऊ शकतात किंवा खूप तीव्र देखील होऊ शकते (Sciatica Symptoms). सायटिका ही एक अशी समस्या आहे ज्यामध्ये कंबरेशी संबंधित कोणत्याही नसेला सूज येते, त्यामुळे कंबरेपासून पायांपर्यंत असह्य वेदना होतात (What Is The Main Cause Of Sciatica).

 

कंबरेपासून पायापर्यंतच्या या दुखण्याला सायटिका म्हणतात. ही समस्या 50 वर्षांवरील लोकांमध्ये अनेकदा दिसून येते. परंतु खराब जीवनशैलीमुळे, ही समस्या अगदी लहान वयोगटातील लोकांना सुद्धा त्रास देत आहे (Sciatica Symptoms).

 

सायटिका हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे ज्यामध्ये सायटिका नर्व्ह (Sciatic Nerve) ला थंडी लागल्याने, जास्त चालल्याने, जड उचलण्याने आणि मणक्यातील समस्या यामुळे वेदना होतात. या समस्येमुळे हिप जॉइंटपासून वेदना सुरू होते आणि हळूहळू पायाच्या तळापर्यंत पसरते.

 

अनेकदा लोक या दुखण्याला कंबरदुखी समजतात आणि त्यावर घरगुती उपाय करू लागतात. ही एक न्यूरोलॉजिकल समस्या आहे ज्यासाठी व्यायाम आणि जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत (Know The Symptoms And Prevention Of Sciatica).

सायटिकाची लक्षणे (Symptoms Of Sciatica) :

1. पाठीच्या खालच्या भागापासून पायापर्यंत वेदना

2. या वेदनांमुळे हालचाल करणे कठीण होते

3. पायात अशक्तपणा किंवा बधीरपणा

4. सुई टोचल्यासारख्या वेदना होणे

5. बोटे किंवा पायांमध्ये वेदनादायक मुंग्या येणे

 

तुम्हाला हा त्रास असेल तर आहारात बदल करा आणि काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घ्या. सायटिका आणि इतर कारणांमुळे पाठदुखी ही एक सामान्य समस्या आहे. काही उपाय करून हा त्रास पुन्हा होण्यापासून रोखता येतो. या त्रासापासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेऊया…

सायटिकापासून बचाव कसा करावा (Prevention Of Sciatica) :
जर तुम्हाला सायटीकाचा त्रास होत असेल तर उठण्याची आणि बसण्याची योग्य पद्धत अवलंबावी.

उभे राहणे, चालणे आणि बसणे या योग्य पद्धतीचा अवलंब करा.

एरोबिक व्यायाम करा. या व्यायामामुळे पोटाच्या आणि पाठीच्या स्नायूंना ताकद मिळते आणि ते लवचिक बनतात.

कोणतीही जड वस्तू उचलल्यास गुडघे वाकवून पाठ सरळ ठेवा. असे केल्याने नितंब आणि पायांवर ताण येतो.

खुर्चीवर बसलात तर पाठ खुर्चीवर नीट ठेवा. अशी खुर्ची वापरा जी बॅक सपोर्ट करते.

खुर्चीवर उशीचा वापर करा, तुमच्या पाठीला सपोर्ट मिळेल.

धूम्रपान करू नका.

वजन नियंत्रणात ठेवा, अन्यथा ही समस्या वाढू शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
\त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Sciatica Symptoms | what is the main cause of sciatica know the symptoms and prevention

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

High Cholesterol Symptoms | जेव्हा शरीरात दिसतील ‘हे’ 6 बदल तर समजून जा नसांमध्ये खराब कोलेस्ट्रॉल झाले जास्त; जाणून घ्या

 

Pimple Home Remedies | पिंपल्स दूर करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय, वाचा सविस्तर

 

Mood Swings |’मूड स्विंग’मुळं नात्यामध्ये आणि कामावर वाईट परिणाम होतोय, तर मग करा ‘हे’ उपाय, जाणून घ्या