Coronavirus : मोठा दिलासा ! शेवटी ‘कोरोना’ला संपविण्याचा उपाय सापडला, जागतिक आरोग्य संघटना (WHO) करणार अखेरची तपासणी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे सध्या जगभरात हाहाकार माजला असून तब्बल 180 देश कोरोनाच्या कचाट्यात सापडले आहेत. मात्र, अद्याप एकाही देशाला कोरोनावर लस शोधता आलेली नाही आहे. दरम्यान, कोरोना विषाणूची लागण झालेल्या पाच गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. हे उपचार कोणत्याही औषधाने नाही तर रक्ताने केले आहेत. उपचारासाठी वारण्यात आलेले रक्त हे त्या रुग्णांचे होते ज्यांना यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झाली होती. चीनमधील रुग्णालयात या उपचाराची चाचणी करण्यात आली. या उपचारातून निरोगी झालेल्या तीन रुग्णांना घरीही पाठवण्यात आले आहे.

वृद्ध रुग्णांच्या रक्ताने उपचार केल्यास कोरोना बरा होऊ शकतो. 27 मार्च रोजी चीनच्या शेनझेन थर्ड पीपल्स हॉस्पिटलने उपचारांच्या या पद्धतीचा रिपोर्ट प्रकाशित करण्यात आला. कोरोनाच्या रुग्णांच्या रक्ताने पाच रुग्णांवर उपचार करण्यात आले. या रुग्णांचे वय 36 ते 73 दरम्यान होते. जुन्या रुग्णांच्या रक्ताने नवीन रुग्णांवर उपचार करण्याच्या या पद्धतीने कोव्हॅलेंट प्लाज्मा असे नाव शास्त्रज्ञांनी दिले आहे. यातून बरेच आजार बरे झाले आहेत.

याद्वारे, जुन्या बरे झालेल्या रूग्णांचे रक्त नवीन रुग्णांच्या रक्तामध्ये मिसळून प्रतिकारशक्ती वाढविली जाते. या तंत्रामध्ये रक्ताच्या आत असलेल्या विषाणूशी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार केले जातात. या अँटीबॉडीज विषाणूंविरूद्ध लढतात आणि त्यांना मारतात. शेन्झेन थर्ड हॉस्पिटलमध्ये संसर्गजन्य रोगांच्या अभ्यासासाठी राष्ट्रीय क्लिनिकल रिसर्च सेंटर देखील आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like