दावा : वैज्ञानिकांनी बनवलंय असं एअर फिल्टर जे हवेतच नष्ट करतं ‘कोरोना’ व्हायरसला, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वैज्ञानिकांनी एक असा फिल्टर बनविण्याचा दावा केला आहे, जो हवेत नोवेल कोरोना व्हायरसला पकडून त्याला त्वरित नष्ट करेल. शास्त्रज्ञांचा हा अविष्कार शाळा, रुग्णालये आणि विमानांसारख्या बंद ठिकाणी कोरोना विषाणूच्या संसर्गाचा फैलाव रोखण्यास मदत करू शकतो. एका अहवालानुसार या ‘एअर फिल्टर’ ने तेथून जाणाऱ्या हवेतून एकाच वेळी 99.8 टक्के कोरोना विषाणू काढून टाकला. अभ्यासात म्हटले आहे की, हे उपकरण व्यावसायिकपणे उपलब्ध निकेल फोम 200 डिग्री सेल्सियस गरम करून तयार केले गेले होते.
याने प्राणघातक बॅक्टेरिया बॅसिलस अँथ्रेसिसच्या 99.9 टक्के बीजकोशांचा नाश केला. बॅसिलस एंथ्रेसीसमुळे अँथ्रॅक्स रोग होतो. अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ ह्युस्टनच्या (यूएच) अभ्यासात सहभागी असलेले झिफेंग रेन म्हणाले की, कोविड – 19 ला विमानतळ आणि विमानांमध्ये, कार्यालयीन इमारतींमध्ये, शाळा आणि समुद्रपर्यटन जहाजांमध्ये पसरण्यापासून रोखण्यासाठी हे फिल्टर उपयुक्त ठरू शकते. विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्याची त्याची क्षमता ही समाजासाठी उपयुक्त ठरू शकते.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, विषाणू सुमारे तीन तास हवेमध्ये राहू शकत होता, म्हणून लवकरच एक फिल्टर तयार करण्याची योजना आखली जात होती, जो लवकरच त्याला समाप्त करेल आणि जगभरातील कामकाज पुन्हा सुरू झाल्यामुळे बंद ठिकाणी व्हायरस नियंत्रित करणे आवश्यक आहे. रेन म्हणाले की, निकेल फोम अनेक महत्वाच्या गरजा भागवते. संशोधकांनी एका निवेदनात म्हटले आहे, “हे सच्छिद्र आहे, जे हवेला वाहण्यास परवानगी देते आणि विद्युत वाहक देखील आहे. जो त्याला तपण्यास परवानगी देतो. हे लवचिकही आहे. ‘ संशोधकांनी हे उपकरण टप्प्याटप्प्याने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.