‘कोरोना’ग्रस्तांच्या पेशी दिसतात ‘अशा’ !

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. कोरोना संसर्गाशी दोन हात करणाऱ्या जगासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांनी कोरोनाची बाधा झालेल्या मानवाच्या पेशी कशा दिसतात, याचे छायाचित्रे प्रसिद्ध केले आहेत. यामुळे आता कोरोना उपचारात मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना विद्यापीठातील चिल्ड्रन्स रिसर्च इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी ही छायाचित्रे प्रसिद्ध केले आहेत. श्वसननलिकेत कोरोनाचा संसर्ग कसा फैलावतो हे छायाचित्रातून स्पष्ट समजत असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या विषाणूला प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेल्या श्वसननलिकेतील पेशींमध्ये संक्रमित करण्यात आले. त्यानंतर फुफ्फुसातील प्रत्येक पेशीत किती विषाणू निर्माण झाले याचाही शोध घेण्यात आला.

वैद्यकीय नियतकालिकात फोटो प्रसिद्ध
ही छायाचित्रे वैद्यकीय नियतकालिक न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाली आहेत. या संशोधनानुसार, शास्त्रज्ञांनी मानवाच्या ब्रॉन्कियल एपीथीलियल पेशींमध्ये कोरोनाला इंजेक्ट केल्यानंतर 96 तास त्यावर नजर ठेवली आणि त्यानंतर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमधून पाहिले. छायाचित्रात निळ्या रंगात दिसणाऱ्या केसांच्या आकारांचे लांब संरचनेला सेलिआ म्हणतात. यामध्यमातून फुफ्फुसातून म्युकसला बाहेर काढले जाते.

छायाचित्रामुळे संशोधनास मदत
संशोधकांनुसार, अशा छायाचित्रांमुळे विषाणूंबाबतची माहिती समजून घेण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय शरीरातील वेगवेगळ्या भागात कोरोनाचा संसर्ग कसा फैलावतो याची माहिती समजून घेता येणार आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, निरोगी व्यक्ती या मास्कच्या वापरामुळे बाधित होण्यापासून बचावले जात असल्याचा दाव्याला या छायाचित्रातून पुष्टी मिळाली आहे.