छत्रपती शिवरायांची बदनामी करणारे शिवप्रेमींच्या ‘रडार’वर !

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जाशुआने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय. मुंबईतील शिवस्मारकाबाबत अग्रिमाने विनोदातून टीका करत छत्रपती शिवाजी महाराज यांची थट्टा केली होती. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने (मनसे) च्या कार्यकर्त्यांनी ज्याठिकाणी शूट केलं तो स्टुडिओ फोडून संताप व्यक्त केला होता.

अग्रिमा जाशुआचे प्रकरण ताजं असताना आता तिच्या या वक्तव्यावरुन कॉमेडियनच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इतर कॉमेडियनची चर्चा आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात स्टुडिओची तोडफोड तसेच अग्रिमाविरुद्ध बोलणाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह संवाद आहेत. तसेच काहींनी अश्लिल शब्दांचाही वापर केलाय तर एकाने शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अपमान केला आहे.

या व्हॉट्सअप ग्रुपचे स्क्रिन शॉट्स सोशल मीडियात व्हायरल झाले. तेव्हापासून पुन्हा एकदा शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त करून संबंधितांना जाब विचारले आहेत. यातील अंकित अग्रवाल नावाच्या एका युजर्सला शिवप्रेमींना दणका दिला. त्यानंतर शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून मी त्यांची जाहीर माफी मागत आहे, असा व्हिडीओ टाकला आहे. मात्र, या प्रकारामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियात शिवप्रेमींचा राग उफाळून आला आहे.

अग्रिमा जाशुआचं काय होतं प्रकरण?
मुंबई येथील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकाबद्दल अग्रिमा जोशुआने विनोदातून टीका केली होती. ही टीका करताना तिने शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. याबाबत अग्रिमा म्हणाली, “शिवाजी या पुतळ्याबाबत अधिक माहिती जाणण्यासाठी मी गुगलवर Quora इंटरनेट सोर्सवर गेली तर कोणीतरी निबंध लिहिला होता.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शिवाजी पुतळ्याचा मास्टर स्ट्रोक आहे जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात सत्ता येईल, दुसऱ्या एकाला वाटलं काहीतरी क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट आहे, तो म्हणाला, या जीपीएस ट्रेकरसुद्धा असणार आहे याशिवाय त्यांच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जी अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांवर नजर ठेवेल. तर तिसरा व्यक्ती येऊन सांगतो, शिवाजी नाही तर शिवाजी महाराज म्हणा, बस्स मी त्यालाच फॉलो केलं” अशा शब्दात अग्रिमाने विनोद केल्यामुळे संताप व्यक्त केला होता.