#Video Viral : काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिलात का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सिंह, रेडा आणि मगर यांचा एक काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ साऊथ अफ्रिकेतील क्रूजर नॅशनल पार्कमधील आहे. क्रूजर कडून हा व्हिडीओ फेसबुकवरही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला 2.5 मिलियन्सहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.

या व्हिडीओत रेडा, सिंह आणि मगर यांच्यात लढाई सुरु असल्याचं दिसत आहे. पार्कमध्ये एका रेड्याला सिंह आणि मगरीने घेरल्याचे दिसते. काट्याची टक्कर देत रेडा सर्व परिस्थितीचा सामना करतो आणि स्वत:चा जीव वाचवण्यासात यशस्वी होतो. व्हिडओत दिसते आहे की, सिंहाची टोळी हरणांचा शिकार करायला येते आणि नदीजवळ त्यांना रेडा दिसतो. सुरुवातीला रेड्याने त्यांना पळवण्याचा प्रयत्न केला. नंतर सिंहाच्या टोळीने त्याला घेरले. त्यानंतर रेडा नदीत उतरला. त्याला माहीत नव्हते की, नदीत मगर आहे जी त्याला शिकार करण्यासाठी टपून बसली आहे. जेव्हा रेडा पाण्यात उतरला आणि थोडा पुढे आल्यानंतर मात्र त्याने रेड्यावर हल्ला केला.

प्रयत्नांची पराकाष्टा करत रेडा नदीच्या बाहेर येतो आणि बराच वेळ किनाऱ्यावर उभा राहतो. त्यानंतर त्याने सिंहाचा सामना करतो आणि त्यांना मागे हटवतो. काही वेळाने तिथे रेड्यांची टोळी येते. त्यानंतर सिंह घाबरून पळून जातात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

Loading...
You might also like