‘त्या’ प्रकरणी २ (PI) पोलिस निरीक्षकांसह उपनिरीक्षक (PSI), हवालदार (PH) तडकाफडकी निलंबीत ; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बोरिवली येथे रविवारी रात्री एका डान्स बारवर अप्पर पोलीस आयुक्तांच्या पथकाने धाड टाकली. त्या ठिकाणी २२ बारबाला आढळून आल्या. त्याचा फटका कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व हवालदार यांना बसला असून त्यांना आपल्या भागात अवैध गोष्टींवर नियंत्रण न ठेवता आल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे, पोलीस निरीक्षक अबंतराव हाके, पोलीस उपनिरीक्षक चेतक गंगे आणि पोलीस हवालदार शिवाजी चाकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

मीरा रोड बारमध्ये आढळल्या २४ बारबाला

दुसऱ्या एका प्रकरणात मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिल्वर पार्क नाक्याजवळील एंजल पॅलेस नावाचा ऑर्केस्ट्रा बार आहे. या बारच्या आड आतमध्ये मोठ्या संख्येने बारबाला अश्लिल नृत्य करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शेखर डोंबे यांना मिळाली. त्यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक प्रकाश कांबळे यांच्या पथकाने या बारवर रविवारी रात्री धाड टाकली. या धाडीत तब्बल २४ बार बाला अश्लिल नाच व हावभाव करताना आढळून आल्या. या प्रकरणी मीरा रोड पोलिसांनी बारच्या चालक, मालकांवर गुन्हा दाखल केला असून बारचा व्यवस्थापक, वेटर आदी ८ जणांना अटक केली आहे.

गरोदरपणात ‘हे’ ४ ब्युटी प्रॉडक्ट कधीही वापरू नका

भाजलेल्या ठिकाणी चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी

जाणून घ्या गुणकारी आवळ्याचे फायदे

‘हाफकिन’मध्ये किफायतशीर औषधांची होणार निर्मिती

‘ग्रीन टी’ प्रमाणात घ्या… नाहीतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या

मोडलेल्या हाडावर ‘गरम’ वस्तू टाकल्यास होईल नुकसान ; घ्या काळजी

Loading...
You might also like