वरिष्ठ पोलीस निरक्षकांनी हवालदारास सॅल्यूट करुन दिला निरोप

कोल्हापुर : पोलीसनामा ऑनलाईन – कर्मचाऱ्यांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सॅल्यूट करताना आपण नेहमीच पाहतो. पण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना एका हवालदाराला सॅल्यूट करताना कधी पाहिले नसेल. पण असे घडले आहे. कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आला होता. त्यावेळी पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी त्यांना सॅल्यूट करुन सर्वांनाचा आश्चर्य़ाचा धक्का दिला. बहुधा वरिष्ठांकडून आपल्या कर्मचाऱ्याला सॅल्यूट करण्याची पोलीस दलातील पहिलीच वेळ असले.
कोल्हापूर पोलिस दलातील पोलिस हवालदार  चंद्रकात जाधव हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. ते कार्यरत असलेल्या लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी पोलिस ठाण्यात त्यांचा सहकुटुंब निरोप समारंभ करून यथोचित गौरव केला. त्याचप्रमाणे सरते शेवटी पोलिस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या कारचे दार स्वतः उघडून जाधव यांना कारमध्ये बसवून स्वतः कारचे दार लावून सर्व पोलिसांसमक्ष सॅल्यूट देवून मानवंदना दिली.
वास्तविक आपल्या पेक्षा वरिष्ठ अधिकारी यांना अशी मानवंदना देण्याची पोलिस खात्याची प्रथा असतांना पोलिस ठाणेच्या एका कर्मचाऱ्यास असा सॅल्यूट देवून निरोप दिल्याने पोलिस निरीक्षक  वसंत बाबर यांच्या बद्दलची सर्व पोलिस दलात प्रतिमा उंचावून त्यांचा सर्वांना अभिमान वाटला.