धक्कादायक ! 12 वर्षीय विद्यार्थीनीला पार्टीला बोलावून 7 विद्यार्थ्यांकडून मुलीवर सामूहिक बलात्कार अन् केला खून

तेजपूर/आसाम : वृत्तसंस्था – एका अल्पवयीन मुलीला पार्टीसाठी बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना आसामच्या विश्वनाथ जिल्ह्यात घडली असून 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून करणाऱ्या 7 विद्यार्थ्यांना पोलिसांनी रविवारी (दि.1) अटक केली. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी नुकतीच दहावीची बोर्डाची परीक्षा दिली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 12 वर्षीय मुलीला पार्टीसाठी बोलावून घेतले. तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला एका झाडाला गळफास लावून खून केला. हा प्रकार शुक्रवारी गोहपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चाकला गावात घडला आहे. चाकला गावातील 12 वर्षीय मुलीवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिला जंगलात नेऊन एका झाडाला गळफास लावून तिचा खून केला. हा प्रकार समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला.
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी रविवारी सात आरोपींना अटक केली.

आरोपींनी परीक्षेनंतर पार्टीच्या बहाण्याने बोलावून घेत तिच्यावर बलात्कार केला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. शुक्रवारी रात्री पीडित मुलीवर सात आरोपींनी बलात्कार केला. त्यानंतर तिला जंगलात नेऊन एका झाडाला गळफास देऊन खून केल्याचे पोलिसांनी सांगितले. पीडित मुलीचा मृतदेह शनिवारी जंगलात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.