वणीमध्ये चाकूचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा घालून ७ लाखांची लूट

यवतमाळ: पोलीसनामा ऑनलाईन 

वणी तालुक्यातील नांदेपेरा येथील विरेंद्र जयस्वाल यांच्या बंगल्यावर रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास सशस्त्र दरोडा घालून दरोडेखोरांनी रोख ७० हजार रुपये व २० तोळे सोने असा एकूण सहा लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

विरेंद्र जयस्वाल यांच्या बंगल्यात सहा दरोडेखोरांनी रविवारी पहाटे २ च्या सुमारास प्रवेश केला़ त्यांच्यातील तिघांनी हेल्मेट घातले होते तर उरलेल्या तिघांनी चेह-यावर स्कार्फ बांधला होता़ त्यांनी घरातील सर्वांना चाकूचा धाक दाखवून घरातील तिजोरी घेऊन ते पळून गेले़
पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दरोडेखोरांचा शोध घेत असताना गावाबाहेर तिजोरी फोडलेली दिसून आली़ दरोडेखोरांनी तिजोरी फोडून त्यातील ऐवज लंपास केला होता.
[amazon_link asins=’B077PWBC7J,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’f06986a1-b3ff-11e8-b370-0b033f014e33′]
हा दरोडा टाकण्यापूर्वी दरोडेखोरांनी याच गावातील डॉ. पांडव यांचे बंद असलेले घर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे त्यांच्या हाती काहीही लागले नाही.