चंदननगर येथील ट्युपीस स्पा सेंटरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

चंदननगर येथील ट्युलीप स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा चंदननगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे तर वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.११) दुपारी पावणे चारच्या सुमारास करण्यात आली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a66a9992-ce11-11e8-91da-35a2b5248ce6′]

महिमा जे पी सिंग (वय-२६ रा.ईडन पार्क सोसायटी, विमाननगर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस सहायक पोलीस निरीक्षक प्रिती शिंत्रे यांनी फिर्याद दिली आहे.

चंदननगर येथील बाळबुधे साहस बिल्डींगमधील ट्युलीप स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी डमी ग्राहक पाठवून खातरजमा करुन घेतले. डमी ग्राहकाने या ठिकाणी स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी गुरुवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास या ठिकाणी छाप टाकून तीन मुलींची सुटका केली. तर वेश्या व्यवसाय करवून घेणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सुटका करण्यात आलेल्या मुलींची हडपसर येथील महमंदवाडी येथील रेस्क्यु होममध्ये ठेवण्यात आले आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ad11a315-ce11-11e8-ac37-2f5e3e74b4f6′]

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला ही पीडित मुलींना पैशाचे अमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत होती. मिळालेल्या पैशातून आरोपी महिला ही आपली उपजिवीका भागवत होती. पुढील तपास चंदननगर पोलीस करीत आहेत.

हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन तरणाला मारहाण
पुणे : गर्दीतून जात असताना दुचाकीस्वार तरुणाने गाडीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरुन तीन जणांनी एका तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत एरीक राजु क्लासो (वय-२३ रा. पंचशील चौक, घोरपडी गाव) जखमी झाला असून त्याने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय दास, सल्या दास, करण यांना अटक केली आहे. एरीक क्लासो हा दुचाकीवरुन जात होता. गर्डी असल्यामुळे त्याने गाडीचा हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने आरोपींनी त्याला लोखंडी पट्ट्याने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. पुढील तपास मुंढवा पोलीस करीत आहेत.