Ajit Pawar | कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारी सोहळ्यात घडू नये

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – shadhi Wari | कुंभमेळ्यात जे घडलं ते आषाढी वारीबाबत (Ashadhi Wari) घडू नये याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी राज्य सरकारने (State Government) सर्वांशी चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे, असे आम्हाला सुद्धा वाटते.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

परंतु सध्या कोरोनाचे (Corona) सावट आहे. त्यात आता तिसऱ्या लाटेचा इशारा (The warning of the third wave) धोका असल्याने त्याचाही विचार करणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar) म्हणाले. आम्ही वारकरी सांप्रदायाच्या भावनांचा आदर करतो, पण राज्याचे आरोग्याचं हित याकडेही लक्ष दिल पाहिजे, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने यंदाच्या वर्षी देखील आषाढी पालखी सोहळा बसने होणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्यातील मानाच्या 10 पालखींना 60 वारकऱ्यांसह 19 जुलैला पंढरपूरला जाण्यास परवानगी दिली आहे.

वाखरीला गेल्यानंतर पुढे होणाऱ्या विधीसाठी शिथिलता राहील. गेल्यावर्षी जसे निर्बंध होते, तसे आता निर्बंध लावले नाहीत. कुंभमेळ्याबाबत जे घडलं तसे घडू नये. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्यानं काही बाबतीत सर्व विचार करुनच निर्णय घ्यावा लागतो. वारकरी संप्रदायाच्या भावना तीव्र असतील, तर विभागीय आयुक्तांना सुचना देऊ. संबंधित मान्यवरांशी चर्चा करण्याबाबत सांगू, असेही पवार म्हणाले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : Ajit Pawar | happened kumbh mela should not happen ashadi wari deputy chief minister ajit pawar

हे देखील वाचा

Pune News | दुर्देवी ! बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर मृत्यू

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23 डॉक्टरांनी गमावले प्राण

Pune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा’; दोघांनी चतुःश्रृंगी परिसरात तरूणाला लुटले

Spa Center in wakad and baner pune | वाकड, बाणेरमधील स्पाच्या नावाखाली चालणार्‍या सेक्स ‘रॅकेट’चा पर्दाफाश; 2 जणांना अटक 5 महिलांची सुटका

Ajit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…

Pune News | पिस्तुल बाळगणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

Pune News | दुर्देवी ! बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर मृत्यू

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23 डॉक्टरांनी गमावले प्राण