‘किंग’ खानच्या सासूच्या फार्म हाऊसवर तब्बल 3 कोटींचां दंड, जाणून घ्या प्रकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार शाहरुख खानची सासू सविता छिब्बा हिच्या फार्म हाऊसवर 3 कोटी रुपयांचा फाईन लावण्यात आला आहे. शाहरुखची सासू सविता आणि त्याची मेहुणी नमिता छिब्बा डेजा वू फार्म्स प्रायवेट लिमिटेडच्या डायरेक्टर आहेत. एका अलिशान बंगल्यासोबतचं हे फार्म हाऊस आलिबागमध्ये आहे. यावर बॉम्बे टेनेंसी अ‍ॅक्टच्या व्हायोलेशनचा आरोप लावण्यात आला आहे.

2008 साली बनवण्यात आलेल्या या बंगल्यात अनेक बॉलिवूड पार्ट्या झाल्या आहेत. यात शाहरुखाच्या 52 व्या वाढदिवसाच्या पार्टीचाही समावेश आहे. 1.3 हेक्टरमध्ये बनलेल्या फार्म हाऊसमध्ये एक स्विमिंग पूल आणि हेलिपॅड देखील आहे. एका इंग्रजी वृत्ताच्या रिपोर्टनुसार, 29 जानेवारी 2018 रोजी कलेक्टर विजय सूर्यवंशी यांनी या फार्म हाऊसला नोटीस पाठवली होती. या नोटीशीत असं म्हटलं होतं की, हा प्लॉट खरेदी केल्यानंतर त्यावेळच्या अ‍ॅडीशनल कलेक्टरनं 13 मे 2005 रोजी या प्लॉटवर शेती करण्यासाठी परवानगी दिली होती.

यात असंही म्हटलं होतं की, वास्तविक फार्म हाऊस तोडून त्याच्या जागेवर नवीन फार्म हाऊस बनवण्यात आलं जे की बॉम्बे टेनेंसी अ‍ॅक्टच्या सेक्शन 63 चं उल्लंघन करतं. फार्म हाऊसच्या डायरेक्टरला सुनावणीसाठी समन्स बजावण्यात आलं आणि त्यांना विचारण्यात आलं की, त्यांच्याविरोधात कारवाई का केली जाऊ नये. काही सुनावण्या झाल्यानंतर 20 जानेवारी 2020 रोजी आणखी एक ऑर्डर देण्यात आली ज्यात उल्लंघन केल्याबद्दल सांगण्यात आलं होतं. त्यांनी 3 कोटी 9 लाख रुपये पेनल्टी द्यावी असंही यात सांगण्यात आलं होतं.

You might also like