Shahaji Bapu Patil | ‘या’ दोघांमुळेच आमच्यात आणि ठाकरेंमध्ये दरी पडली; शहाजीबापूंनी सांगितली नावं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेत बंडखोरी (Rebellion in Shivsena) का केली, याची वेगवेगळी कारणे शिंदे गटातील आमदार तसेच स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सतत सांगत असतात. यामध्ये उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव आघाडीवर असते. परंतु आता शिंदे गटातील सांगोल्याचे आमदार शहाजीबापू (Shahaji Bapu Patil) यांनी ठाकरे आणि शिंदे गटात दरी कुणामुळे पडली, त्यांची नावे सांगितली आहेत. शहाजी पाटील (Shahaji Bapu Patil)  यांनी म्हटले की, आमच्यात आणि उद्धव ठाकरे यांच्यात दरी पडली, त्यात शिवसेनेच्या दोन्ही राऊतांचा मोठा वाटा आहे. या दोघांसोबतच आणखी दोघं-तिघं यासाठी कारणीभूत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) आणि विनायक राऊत (Vinayak Raut) यांना पाटील यांनी लक्ष्य केले आहे.

शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) म्हणाले, अंधेरी पोटनिवडणुकीची (Andheri by-Election) जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला (BJP) सोडली. येथे युतीचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) निवडणूक लढवत आहेत. त्यांनी गेले तीन महिने काम केलेले असून त्यांना मागील निवडणुकीतही चांगली मते पडली होती. त्यामुळे ही जागा भाजपला देण्यात आली. विजय मुरजी पटेल यांचाच होईल.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री यांच्या भेटीगाठी पाहता आगामी काळात शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपासोबत मनसे येणार का, असा प्रश्ना विचारला असता पाटील म्हणाले, 100 टक्के येत्या काळात ही युती होऊ शकते. ही युती व्हावी, राज्याच्या हितासाठी आणि कल्याणासाठी अशी युती निश्चितपणे व्हावी.

ते म्हणाले, ढाल तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) आहे. महाराजांनी आणि मावळ्यांनी ढाल तलवार हातात घेऊन हिंदवी स्वराज्य उभे केले होते. आमचे चिन्ह हे ऐतिहासिक परंपरेवर चिन्ह आहे. त्यामुळे शीख बांधवांनी आक्षेप घेणे चुकीचे आहे. आज शीख, उद्या राजस्थान मधील राजपुत, कर्नाटक मधील रेड्डी म्हणतील भावना दुखावल्या. हे चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) आम्हाला दिले आहे. शीख बांधवांतील एखाद्या पक्षाने क्षत्रियांचे चिन्ह घ्यावे.

ते पुढे म्हणाले, शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव हे तात्पुरते गोठवलेय. हा निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीनंतर चिन्हाबाबत उत्तर मिळेल.
कोणत्याही स्थितीत आमच्यावर भाजपमध्ये जाण्याची वेळ येणार नाही.
एकनाथ शिंदे समर्थपणे हा पक्ष चालवतील.
आज 50 आमदारांचा पक्ष उद्या 80 ते 90 आमदारांचा पक्ष म्हणून ओळखला जाईल.

शहाजीबापू पाटील यांनी सांगितले की, ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र
फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली.
तेव्हापासून राजकारणात वेगवेगळ्या प्रकारची गणित चालू झाली आणि आगामी काळात वेगवेगळी गणिते आणि
आराखडे बघायला मिळतील.

Web Title :- Shahaji Bapu Patil |  two rauts of shivsena created rift between shinde group and uddhav thackeray shahajibapu told reason for split in shivsena

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा