शाहरुख खान ठरला ‘ट्विटरचा बादशाह’

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान पुन्हा एकदा सोशल मीडियाचा बादशाह ठरला आहे.कारण शाहरुखने ट्विटरवर तब्बल ३ कोटी ६० लाख फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्याच्या चाहत्यांची संख्या जास्त आहे. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय राहणाऱ्या कलाकारांमध्ये शाहरुख खानचं नाव घेतलं जात आहे.

बॉलिवूडच्या ‘बाजीगर’आणि ट्विटरचा ‘बादशाह’ शाहरुख खानचे ३६ मिलियन फॉलोअर्स आहेत.त्याच्या फॉलोअर्स च्या संख्येत वाढ झाल्याने ‘#SRK36Million’ हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहे. शाहरुख खानने गेल्या वर्षी फॉलोअर्स च्या संख्येत अमिताभ बच्चन यांना मागे टाकले आहे. सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स हे शाहरुख खानचे आहेत. ३६ मिलियन या आकड्याने त्याने बिग बी अमिताभ बच्चन आणि भाईजान सलमान खान ला मागे टाकले आहे. बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणजेच आमिर खान याचा ट्विटर फॉलोअर्सचा आकडा दोन्ही खान आणि बच्चन या तिघांच्या तुलनेत बराच कमी आहे.

शाहरुख खानच्या आगामी ‘झिरो’ चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता लागून राहिली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये प्रदर्शित झालेला ‘जब हॅरी मेट सेजल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला होता.

जाहिरात