Shambhuraj Desai | महापरिनिर्वाण दिनाला गालबोट लागू नये याकरिता दौरा पुढे ढकलला; शंभूराज देसाई

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Shambhuraj Desai | महाराष्ट्र कर्नाटक राज्यांच्या सीमाप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्री बेळगावला जाणार होते. पण, कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्याने दौरा पुढे घेतला आहे. मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मंगळवारचा नियोजित दौरा पुढे ढकलला आहे.

 

त्यावर शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिले आहे. देसाई म्हणाले, बेळगावातील काही संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आम्ही जाणार होतो. मात्र, आजच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, कुठेही आजच्या दिवसाला गालबोट लागू नये, यासाठी आम्ही बेळगाव दौरा पुढे ढकलत आहोत. आमचा दौरा पुढे गेला आहे. रद्द झालेला नाही. दौऱ्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही तिकडे जाऊ शकतो. आम्हाला सामंजस्याची भूमिका घ्यायची आहे. (Shambhuraj Desai)

 

बेळगाव सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकारकडे भूमिका नाही. ते कर्नाटकला घाबरत आहेत, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, 1986 च्या आंदोलनात शरद पवार, एस. एम. जोशी आदी लोकांनी पोलिसांचा लाठीमार खाल्ला, पण ते लोक मागे हटले नाहीत. आणि आताचे नेते बसवराज बोम्मई यांनी तंबी दिल्यावर लगेच दौरा पुढे ढकलून शांत बसले आहेत.

 

Web Title :- Shambhuraj Desai | maharashtra and karnataka border dispute minister chandrakant patil and shabhuraj desai postpone belgaum visit

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

SSC HSC Exam | सवलतीच्या गुणांसाठी विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आता 50 रुपये; शिक्षण मंडळाचा निर्णय

Ramdas Athawale | ‘भीमशक्ती प्रकाश आंबेडकरांसोबत नसून माझ्यासोबत’ – रामदास आठवले

Supriya Sule | ‘शरद पवारांनी लाठ्या खाल्ल्या; पण माघार नाही घेतली’ – सुप्रिया सुळे

Pune Pimpri Crime | अल्पवयीन मुलाला शारीरिक संबंधास भाग पाडणाऱ्या 20 वर्षीय तरुणीवर FIR; चाकण परिसरातील धक्कादायक घटना

Sharad Pawar – Maharashtra Karnataka Border Issue | ‘येत्या २४ तासामध्ये महाराष्ट्रातील वाहनांवरील हल्ले थांबले नाही तर…’ – शरद पवार