Shambhuraj Desai On Maharashtra MLA Disqualification | एकनाथ शिंदेंसह कोणताच आमदार अपात्र होणार नाही, शंभूराज देसाई यांना ठाम विश्वास

पिंपरी : Shambhuraj Desai On Maharashtra MLA Disqualification शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी, कारवाई बाबत शंभूराज देसाई यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. शिंदे यांना विधानपरिषदेवर जाण्याच्या दुसऱ्या पर्यायाची आवश्यकताच भासणार नाही, असा ठाम विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे. ते बालेवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासह इतर मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. (Shambhuraj Desai On Maharashtra MLA Disqualification )

शंभूराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Sinde) यांच्यासह कोणताही आमदार अपात्र होणार नाही. नियमबाह्य काहीच केले नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीत त्याचा आदर राहील. शिंदे यांना विधानपरिषदेवर जाण्याच्या दुसऱ्या पर्यायाची आवश्यकता भासणार नाही.

शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेनेचा एकही आमदार अपात्र होणार नाही. आम्ही कायद्याचा अभ्यास केला असून चौकटीत बसणारा, सर्व बाजू तपासून आम्ही निर्णय घेतला. कोणताही नियमभंग केला नाही.
पक्ष सोडला नाही. नेतृत्वाबाबत आमचे मतभेद होते. त्यामुळे नेतृत्व बदलण्यासाठीचा उठाव केला होता.
ज्या चिन्हावर निवडून आलो, ते धनुष्यबाण नियमाने आम्हाला मिळाले, असे देसाई म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maratha Agitators On Sanjay Raut | संजय राऊत चले जाओ…मराठा आंदोलकांनी संजय राऊतांना घेरले, जोरदार घोषणाबाजी

एकनाथ शिंदेंना विधान परिषदेवर जाण्याची गरज नाही, शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचा विश्वास

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांची प्रकृती खालावली,
देवेंद्र फडणवीस म्हणाले -‘जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर…’ (व्हिडिओ)