Shambhuraj Desai | ‘अजित पवार महायुतीत…’ शंभूराज देसाईं म्हणाले- ‘भाजप आणि आमचं टार्गेट सेट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजप (BJP) किंवा शिवसेनेच्या शिंदे गटात (Shiv Sena Shinde Group) जातील अशी अफवा मागील काही दिवसांपासून पसरत आहे. भाजप नेते आणि शिवेसेना शिंदे गटाचे आमदार (MLA) यावर वेगवेगळी विधानं करत आहेत. तर, अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची दिल्लीत भेट घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान, अजित पवार भाजप किंवा महायुतीत येणार का असा प्रश्न मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना विचारला. यावर बोलताना अजित पवार (Shambhuraj Desai) यांच्या सारखा कोणी महायुतीत येत असेल तर तर आम्ही त्याचं स्वागतच करु असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आमचं टार्गेट सेट

भाजप आणि आमचं (शिवसेना शिंदे गट) 200 हून अधिक जागा जिंकण्याचं (200 हून अधिक आमदार)
टार्गेट सेट आहे. यामध्ये अजित पवारांसारखा कोणी येत असेल तर त्याचं स्वागतच आहे.
भाजप, शिवसेना, आरपीआय (RPI), इतर मित्रपक्ष आणि अपक्ष अशी आमची महायुती आहे.
ही महायुती अधिक भक्कम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
यामध्ये आणखी कोण येणार असेल तर त्याचे स्वागतच आहे, असे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सांगितले.

2024 साठीचं लक्ष्य तयार

आम्ही (महायुती) आगामी विधानसभा निवडणूक 2024 (Assembly Election 2024) साठीचं लक्ष्य तयार केलं आहे.
आम्हाला 200 हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. या जागा 200 पेक्षा जास्त, 225 किंवा 250 करण्यासाठी
आम्हाला कोण मदत करणार असेल, अधिक जागा निवडून आणण्यासाठी पाठिंबा देणार असेल,
आमच्या महायुतीत भर पडून ती मोठी होणार असेल तर आम्ही त्यांचं स्वागतच करु.
सध्या आम्ही 200 आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवलं असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितलं.

Web Title :-  Shambhuraj Desai | shambhuraj desai says we will welcome ajit pawar in mahayuti

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : ग्रीनफिल्ड रेस्टोबारच्या दोघांवर गुंडांकडून हत्याराने सपासप वार, खुनी हल्ला करणारे तिघे ताब्यात

MNS Chief Raj Thackeray | हे प्रशासनाला कळलं नाही का?, श्री सदस्यांना श्रद्धांजली वाहत राज ठाकरेंनी सरकारला सुनावले

Maharashtra Bhushan Award | महाराष्ट्र भूषण कार्यक्रमानंतर 11 जणांचा उष्माघाताने मृत्यू, विरोधकांकडून सरकारवर टीकास्त्र