Shambhuraj Desai | “आमची हिंमत पाच महिन्यांपूर्वीच दाखवली”; संजय राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा सध्या पुरता टाळला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली होती, तर “आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना किमान आम्ही बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, तिने पाच महिन्यांपूर्वीच त्यांना दाखवलेलं आहे. आमची हिंमत काय आहे?, आमच्यात काय धमक आहे?, याचा संजय राऊतांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आमच्याबाबत त्यांनी ते बोलू नये,” असे म्हणत शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

 

महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई सीमाप्रश्नासंबंधी कर्नाटक दौरा करणार होते. मात्र, हा सीमावाद अजून चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील आणि देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्याने हा दौरा रद्द झाल्याचे समोर येत आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजपा सरकारची भरपूर टीका केली, तर संजय राऊतांच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

 

संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते, “महाराष्ट्रात कबड्डीचा खेळ असून, त्याला एक सीमारेषा असते. या दोन मंत्र्यांनी किमान महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमारेषेला स्पर्श करून तरी यायला हवं होतं. बाकी कबड्डी महाराष्ट्रात काय खेळायची ती खेळा. पण, तिकडे सीमेवर तरी जाऊन यायला हवं. या सरकारमध्ये काही हिंमत नाही. ही हतबल, लाचार लोकं असून, स्वतः काही करू शकत नाहीत. ते फक्त बोलतात, आम्हाला शिव्या घालतात. जर जमत असेल तर त्या बोम्मईंना शिव्या घालून त्यांच्या नावाने बोंबला. शक्य असेल तर शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना शिव्या घाला. आपण मंत्री आहात, आपल्याला घटनात्मक दर्जा आहे. आपल्याला कायदेशीर संरक्षण आहे त्यामुळे आपण जायला हवं. मात्र, मुळमुळीत धोरणं असलेलं हे सरकार आहे,” अशी टीका राऊत यांनी केली होती.

या टीकेला प्रत्युत्तर देत शंभूराज देसाई म्हणाले, “महाराष्ट्रात भाजपा व शिवसेनेचं जे सरकार आहे,
हे सरकार महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची, सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी,
महाराष्ट्राकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, हे समजून घेण्यासाठी तिथे जात आहे.
त्यामुळे कोणात धमक आहे आणि कोणामध्ये धमक नाही हे नुसतं बोलण्यापेक्षा संजय राऊतांना माझं एवढंच सांगणं आहे,
की जे तुमच्या काळात २०२० पासून सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या सवलती,
त्यांना राज्याकडून केली जाणारी मदत थांबली होती, ती शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर तत्काळ सुरू झालेली आहे.
तुम्ही केवळ बोलता आम्ही करून दाखवतो,” असंही मंत्री देसाईंनी यावेळी म्हणाले.

 

Web Title :- Shambhuraj Desai | we already showed sanjay raut five months ago what guts we have shambhuraj desais reply

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | ‘मागासवर्गीय समाजाला स्वतःचे हित कळतं…’; चंद्रकांत बावनकुळेंची प्रतिक्रिया

ShivendraRaje Bhosale | उदयनराजे भोसलेंच्या आंदोलनामागे कोण?; काही राजकीय स्वार्थ… – शिवेंद्रराजे भोसले

Kirit Somaiya | शिवाजी महाराजांबद्दल बोलताना काळजी घेतलीच पाहिजे – किरीट सोमय्या