शरद पवार सोडवणार ‘महाशिवआघाडी’तील ‘तिढा’, होणार अंतिम ‘फॉर्म्युला’ निश्चित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तास्थापनेवरुन अनेक दिवासांपासून तिढा कायम आहे. युतीचं बिनसल्याची चिन्हे असताना चर्चा रंगली आहे ती काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाशिवआघाडीची. परंतू या आघाडीचा सत्तावाटपातील फॉर्म्युला जळताना दिसत नाही. याच कारणाने राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. राज्यातील खलबतं आता दिल्ली सुरु होणार आहे. या दोन्ही नेत्यांत दिल्लीत एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

राज्यातील सत्तावाटपावरुन महाशिवआघाडीत शिक्कामोर्तब झाले नाही. याचसाठी शरद पवार आणि सोनिया गांधीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्राम, पदे, जबाबदाऱ्या यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे 3 – 4 दिवस चालणाऱ्या या बैठका राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी महत्वाच्या आहेत.

या दरम्यान महाशिवआघाडी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नबाव मलिक यांची महत्वाचे वक्यव्य केले. ते म्हणाले की राज्यात महाशिवआघाडीचे सरकार आल्यास त्यात शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद गेल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कसलीही अडचण नाही.

राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेना मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपने शब्द न पाळल्याचे सांगत भाजपपासून दूर झाली. परंतू त्यानिमित्ताने महाशिवआघाडीच्या तारा जुळल्या, पण त्यांचे सत्तावाटपाच्या तिढ्यावरुन अडून आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी राष्ट्रवादीशी चर्चा झाल्यानंतर काल दुपारी उद्धव ठाकरेंशी देखील चर्चा केली, त्यावेळी सर्व काही योग्य दिशेने सुरु आहे असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. परंतू सत्तावाटपावर काय हे अजून अस्पष्ट आहे.

तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रुग्णालयातून बाहेर येताच सांगितले की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल. त्यानंतर अमित शहांची मुलाखत माध्यमांतून समोर आली. त्या शहांनी मुख्यमंत्रिपदाची कोणतीही ऑफर दिली नव्हती असे सांगितले. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहांच्या विधानाचा समाचार घेतला.

Visit : Policenama.com