शरद पवारांनी नरेंद्र मोदींना क्लीनचीट दिलेली नाही : सुप्रिया सुळे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कुठेही क्लीनचीट दिलेली नाही. प्रसारमाध्यमांनी शरद पवारांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी पवारांच्या वक्तव्यानंतर राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीतही खळबळ उडाली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c931c458-c397-11e8-937f-b52d86b37aa9′]

याबाबत स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, जे कोणी पवारांनी क्लीनचीट दिली असे सांगत आहेत, त्यांनी ती मुलाखत नीट पाहिलेली नाही किंवा ते जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. शरद पवारांनी तीन गोष्टी सांगितल्या त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विमानांच्या किंमती का वाढल्या? ते सरकारने स्पष्ट करावे. राफेल व्यवहाराची संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी झाली पाहिजे. भाजपाने बोफोर्सच्यावेळी जेपीसीची मागणी केली आणि आता राफेलच्यावेळी ते सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत, असे पवार म्हणाले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पवार यांनी भाजपाच्या या दुटप्पीपणावर टीका केली होती, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हडपसर पोलिसांमुळे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

शरद पवार यांनी राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिनचीट दिल्याच्या वृत्तानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, तारिक अन्वर यांनी पक्ष सोडल्याने वाईट वाटले. ते २० वर्षांपासून पक्षासोबत होते. त्यांनी शरद पवारांना एकदा फोन करुन चर्चा करायला हवी होती.

[amazon_link asins=’B0756Z53JN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’06aa4f26-c398-11e8-ad10-918f998b30f9′]

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य सरचिटणीस  आहेत. त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा आणि लोकसभेतील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. राफेल विमान व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बाजू घेतल्याने नाराज झालेल्या अन्वर यांनी अचानक राजीनामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.