Sharad Pawar | शरद पवारांनी घेतली बंडखोरांबाबत आक्रमक भूमिका; म्हणाले,“जे गेलेत त्यांच्यासाठी दरवाजे बंद…”

मुंबई: पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर पक्षामध्ये दोन गट निर्माण झाले. राष्ट्रवादीचा एक गट सत्तेमध्ये तर एक गट विरोधामध्ये असल्याचे चित्र सध्या आहे. आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पक्षबांधणी करण्यास सुरुवात केली असून शक्तीप्रदर्शन देखील सुरु केले आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट कामाला लागले असून आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये (Yashwantrao Chavan Centre) शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीतील आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. या सर्वांना खासदार शरद पवार यांनी संबोधित करत त्यांचे मनोबल देखील वाढवले. “जे गेलेत त्यांच्यासाठी दरवाजे बंद झाले आहेत” असे मोठे विधान यावेळी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.

राष्ट्रवादीच्या या बैठकीमध्ये शरद पवार यांनी गेले त्यांचा विचार सोडून कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीमध्ये (MVA) ज्या आपल्या वाट्याला 70-80 जागा येतील त्या जिंकण्याच्या तयारीला लागा असे देखील राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले की, “पक्षातील काही सहकारी आता हळूच शंका काढतात. आता झालं ठिक आहे. आम्ही कामाला लागलो. पण परत आल्यावर काय? ते आता परत आल्यावर डोक्यातून काढून टाका. या संदर्भात आता आपण निर्णय घेणार नाही, अशा संकटाच्या काळात जे मजबुतीने उभे राहिले, ते खरे आणि त्याच पद्धतीने निवडणुकीला जावे लागेल.” असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

देशामध्ये सध्या ‘इंडिया’ की ‘भारत’ यावरुन राजकारण तापले आहे.
मोदी सरकार देशाचे इंग्रजी भाषेतील नाव बदलून ‘भारत’ करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
G20 मध्ये देखील पंतप्रधान मोदींसमोर (PM Narendra Modi) ‘भारत’ (Bharat) नावाची पाटी होती.
यावरुन देखील शरद पवार यांनी केंद्र सरकारला (Central Government) टोला लगावला आहे.
देशाचं नाव बदलण्याचा इतका अट्टाहास का? मग आता ‘गेटवे ऑफ इंडिया’ (Gateway Of India) आणि ‘रिझर्व्ह बँके’
चे (Reserve Bank of India) देखील नाव बदला, अशा शब्दांत शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशाचे नाव बदलण्यावरुन सुनावले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Atul Bhatkhalkar | भातखळकर यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र; म्हणाले – ’40 आमदार मराठीत काय बोलत होते…’