Sharad Pawar On Devendra Fadnavis | फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुली; शरद पवारांचा हल्लाबोल, आरक्षणासाठी सुचवला पर्याय

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Devendra Fadnavis | जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज व गोळीबाराचे पडसाद राज्यभर उमटले. अनेक ठिकाणी आंदोलने, बंद, उपोषणे केली जात आहेत. मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) मुद्दा आता पेटला असून विरोधकांनी राज्य सरकारला घेरले आहे. सरकारने लाठीचार्जचा आदेश दिला होता असा आरोप देखील विरोधकांकडून करण्यात आला. यावर महायुतीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सरकारची बाजू मांडली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व अजित पवार (Ajit Pawar) यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करत आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन देखील केले.

जालन्यामध्ये झालेल्या आंदोलकांवरील हल्ल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे. आता या प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. ‘फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुली आहे’, असे देखील पवार म्हणाले आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) इतर पर्याय देखील शरद पवारांनी सुचवला आहे. (Sharad Pawar On Devendra Fadnavis)

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सध्या जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत फडणवीसांनी
मागितलेली माफी व मराठा आरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारला (Central Government) पर्याय सुचवला आहे.
महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची जाहीर माफी मागितली.
“या आधी 2014 साली एवढी आंदोलनं झाली तेव्हा युतीचं सरकार होतं आणि कधीच बळाचा वापर झाला नाही.
पण आता करण्यात आलेल्या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. लोक जखमी झाले आहेत.
त्यांची मी क्षमा याचना करतो. मराठा समाजाची क्षमा मागतो.” या शब्दांमध्ये फडणवीसांनी माफी मागितली.
यावर शरद पवार प्रतिक्रिया देत म्हणाले की, “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे
गुन्ह्याची कबुलीच देणं आहे.” असे शरद पवार म्हणाले आहेत. (Sharad Pawar On Devendra Fadnavis)

शरद पवारांनी ओबीसीच्या कोट्यातून आणखी वाटेकरी करुन मराठा समाजाला आरक्षण दिल्याने सुद्धा
ओबीसी गरीब लोकांवर अन्याय होईल असे सांगितले. मराठा आरक्षणासाठी त्यांनी केंद्र सरकारला पर्याय सुचवला आहे.
शरद पवार म्हणाले की, “आज जी आरक्षणाची 50 टक्क्यांची अट आहे, यात आणखी 15 ते 16 टक्क्यांची
वाढ करण्यासंदर्भातील दुरुस्ती पार्लमेंटमध्ये (Amendment In Parliament) केंद्र सरकारने करून घेतली,
तर हे प्रश्न सुटतील, ओबीसी आणि इतर लोकांमध्ये मतभेद नको, त्यांच्यात वाद करायचा कुणी प्रयत्न करत असेल,
तर आमचा त्यांना पाठिंबा नाही.” असा पर्याय सुचवत त्यांनी सरकारला या प्रकरणाबद्दल खडसावले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला अटक; लोहगावमधील घटना

Shasan Aplya Dari | ‘शासन आपल्या दारी’ मुळे साडेबावीस लाख लाभार्थ्यांना लाभ