Sharad Pawar On Modi Government | शरद पवारांनी मोदी सरकारवर टीका करताना दिला श्रीलंकेतील स्थितीचा दाखला; म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar On Modi Government | आज देशातील सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीत झाली आहे. ते म्हणतील त्याप्रमाणे देशाचा कारभार चालवायचा ही भूमिका घेतली जात आहे. मात्र, सत्तेचा गैरवापर होत असेल तर ती टिकत नसते, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टिका केली. यावेळी त्यांनी श्रीलंकेतील स्थितीचे उदाहरण देखील दिले. ते नागपूरमध्ये आयोजित पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. (Sharad Pawar On Modi Government)

 

विरोधी आवाज बंद पाडत आहेत
राज्यातील सत्तांतर आणि यातील केंद्राच्या भूमीकेवर बोलताना शरद पवार म्हणाले, देशाचे राजकारण ज्यांच्याकडे आहे त्यांनी सत्ता केंद्रीत केली आहे. त्याच्या जोरावर विरोधी आवाज बंद पाडत आहेत. मध्य प्रदेश, कर्नाटकमधील सरकारे पाडण्यात आली. महाराष्ट्रातही शिवसेनेच्या काही लोकांना हाताशी घेऊन चांगले चाललेले सरकार पाडण्याचा निर्णय दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी घेतला. (Sharad Pawar On Modi Government)

 

केंद्र सरकारवर टिका करताना शरद पवार म्हणाले, आम्ही सांगतो तसा कारभार करा, आम्ही सांगतो ती विचारधारा स्विकारा असे सांगितले जातेय. लोकशाहीच्या मार्गाने सत्तेवर आलात तरी आम्ही घालव्याशिवाय राहणार नाही, हेच काम दिल्लीच्या नेतृत्वाने केलेय.

 

देशातील सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीत
ते पुढे म्हणाले, आज ठिकठिकाणी ही उदाहरणे दिसत आहेत. अधिकारांचा गैरवापर होतोय. दहशत निर्माण केली जात आहे. पण किही झाले तरी या गोष्टी टिकत नसतात. कारण सत्तेचा दोष असतो, तो म्हणजे सत्ता केंद्रीत झाली की ती भ्रष्ट होते. आज देशातील सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती केंद्रीत झालीय. ते म्हणतील त्याप्रमाणे देशाचा कारभार चालवायचा ही भूमिका आहे.

आंदोलन हा लोकशाहीचा अधिकार
केंद्र सरकारने असंसदिय शब्द आणि वर्तनाबाबत काढलेल्या आदेशाबाबत शरद पवार म्हणाले, दिल्लीत अनेकदा खासदार संसदेतून सभात्याग केल्यानंतर गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शने करतात किंवा शांत बसून निषेध नोंदवतात. हा लोकशाहीचा अधिकार आहे. सभागृहात तुम्ही काही ऐकत नसाल आणि त्यामुळे सभात्याग करत बाहेर जाऊन शांत बसणे हा गुन्हा नाही. पण आदेशात गांधींचा पुतळा आणि संसदेत कोणी घोषणा द्यायच्या नाहीत, बसायचे नाही, आंदोलन करायचे नाही असे सांगण्यात आले आहे. लोकशाहीत व्यक्त होण्याचे हे साधे मार्ग आहेत. याचा अर्थ सगळी सत्ता आमच्या हातात केंद्रीत ठेवणार आणि त्यादृष्टीने देश चालवणार असा आहे.

 

श्रीलंकेत सत्ता केंद्रीत झाली
श्रीलंकेतील स्थितीचे उदाहरण देत पवार म्हणाले, केंद्र सरकारचे जे सुरू आहे अशा गोष्टी टिकत नसतात. श्रीलंकेत आज काय चित्र दिसत आहे. श्रीलंकेत एका कुटुंबाकडे राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणपद होते. सत्ता केंद्रीत झाली होती. केंद्रीत झालेली सत्ता हवी तशी आम्ही वापरणार. कोणी विरोध केला तर तुरुंगात टाकणार अशा गोष्टी झाल्या.

 

आज श्रीलंकेत राष्ट्रपतींच्या घरात घुसून संघर्ष केला जात आहे. घराणे देश सोडून बाहेर गेले आहे. रस्त्यावर लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत. कारण सत्तेचा गैरवापर होत असेल तर ती टिकत नसते. लोक आवाज उठवत असतात आणि श्रीलंकेत घडलेले सगळे जग पाहत आहे, असे पवार म्हणाले.

 

बाबासाहेबांनी दिलेला अधिकार घेऊन पुढे जायचे
उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना पवार पुढे म्हणाले, आपण एकसंघ राहिले पाहिजे. लोकशाहीत बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला आहे. संस्था कशी चालवायची याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. हाच आदर्श नजरेपुढे ठेवून पुढे जायचे आहे. त्यासाठी जबरदस्त आणि शक्तीशाली संघटनेची गरज आहे. राष्ट्रवादीच्या विचाराने ती संघटना आपण एकत्र करु शकलो, तरी दिल्लीत सत्ता केंद्रीत करण्याचा प्रयत्न करणार्‍यांना धडा शिकवू आणि देश योग्य रितीने चालेल याची खबरदारी घेऊ.

देशमुख, मलिकांवर दहशत निर्माण करण्याच्या हेतूने कारवाई
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत पवार म्हणाले,
पहिल्या दिवसापासून सरकार घालवण्यासाठी प्रयत्न सुरु होते.
यामध्ये आपल्या दोन नेत्यांना जबरदस्त किंमत मोजावी लागली. अनिल देशमुखांचे काम उत्तम होते.
पण जुन्या शिक्षणसंस्थेला मदत करण्याचा निर्णय घेतल्याचे निमित्त करुन त्यांच्यावर खोटे खटले टाकण्यात आले.
सत्तेचा गैरवापर केला असता आणि त्यासाठी कारवाई झाली असती तर समजू शकतो. दहशत निर्माण करण्याच्या हेतूने ही कारवाई केली.

पवार पुढे म्हणाले, नवाब मलिक यांच्यावरही तीच वेळ आली. नवाब मलिक मांडत असलेल्या भूमिकेकडे देशाचे लक्ष असायचे.
दिल्लीत संसदेतही काही लोक नवाब मलिक आज काय म्हणाले असे विचारायचे.
त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना हे सहन झाले नाही, आणि त्यांच्यावर जुन्या केसमध्ये कारवाई करत आपल्यापासून बाजूला केले.

 

Web Title :- Sharad Pawar On Modi Government | ncp sharad pawar central government pm narendra modi sri lanka crisis nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | राज ठाकरे-फडणवीस भेटीवर सुप्रिया सुळेंचा टोला; म्हणाल्या – एक आमदार असणार्‍याकडे 105 आमदार असणारा…

 

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; म्हणाले – ‘माझ्याकडे असे कलाकार, तुम्हाला कळणारही नाही…’

 

Soil Health Card | गावात राहून सरकारी मदतीने करा ‘हा’ बिझनेस, होईल शेतकर्‍यांची गर्दी, लाखोत होईल कमाई