Sharad Pawar On Porsche Car Accident Pune | पुणे अपघात प्रकरणात गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली; प्रकरणाला वेगळे स्वरूप न देण्याचे पवारांचे भाष्य

पुणे : Sharad Pawar On Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर येथील अपघातामुळे दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. पोलिसांच्या कारवाईला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर राजकारण चांगलेच तापले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. समाजमाध्यमातूनही याबाबत रोष व्यक्त केला जाऊ लागला. (Kalyani Nagar Accident)

या प्रकरणाबाबत आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu), वसंत मोरे (Vasant More), खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) , अजित पवार (Ajit Pawar) यांसह इतर नेत्यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली .

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आयुक्तालयाला भेट देत प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना सूचना केल्या. यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आल्याचे दिसले. या अपघात प्रकरणातील आरोपींच्या वकिलाचे शरद पवार यांच्याशी संबंध असल्याचा फोटो व्हायरल झाला.

त्यावर शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना उत्तर दिले की , ” एखाद्या पेपरने वकिलासोबत माझा फोटो छापला म्हणून माझा अपघाताशी संबंध कसा जोडता? प्रत्येक गोष्टीवर मी भाष्य करणे गरजेचे नाही. या प्रकरणात गृहमंत्र्यांनी जी जबाबदारी असते ती पार पाडलेली आहे. त्यामुळे उगीच त्याला वेगळे स्वरूप देण्याची गरज नाही. असे शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हंटले आहे. (Sharad Pawar On Porsche Car Accident Pune)

पवारांच्या या विधानामुळे या अपघात प्रकरणावरून राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनाच फटकारल्याचे दिसून येत आहे.
कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात आतापर्यंत सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
तसेच गुन्हेशाखेकडून विविध १०० सीसीटीव्ही यांची तपासणी करण्याचे काम सुरु आहे.
या अपघाताच्या घटनेला घेऊन नवनवे खुलासे समोर येत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवाराचे उमेदवार पाडण्यासाठी शिंदे आणि यंत्रणेचे खास प्रयत्न,
निवडणुकीत ‘समृद्धी’ने डोळे दिपले : संजय राऊत

Sharad Pawar | शरद पवारांना मोठा धक्का; दोन नेते साथ सोडणार?

Ajit Pawar | अजित पवारांच्या रडारवर कोण? कोणाची जाणार खुर्ची, पदाधिकारी टेन्शनमध्ये…