Sharad Pawar | राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी करणार संभाजीराजेंना मदत? शरद पवार म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Sharad Pawar | खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राज्यसभा निवडणुकीबाबत मांडलेल्या गणितावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार असल्याचे संभाजीराजेंनी (Sambhaji Raje) जाहीर केले होते. भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपल्याला मदत करावी, भाजप (BJP) आणि मविआकडे (MVA) अतिरिक्त मते आहेत. या अतिरिक्त मतांच्या आधारे आपण निवडून येऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते. सध्या ते भाजपाकडून राज्यसभेचे खासदार आहेत.

 

राज्यसभेचा उमेदवार म्हणून निवडून येण्यासाठी 41 मते आवश्यक असतात. महाविकास आघाडीकडे 27 अतिरिक्त मते आहेत. ती मते संभाजीराजेंना मिळणार का, असा प्रश्न शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारला असता त्यांनी महाविकास आघाडीचे मतांचे गणित मांडताना सांगितले की, राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज निवडून येईल. तेवढी मते पक्षाकडे आहेत. एक जण निवडून गेल्यावरही आमच्याकडे 10 मते शिल्लक राहतात.

 

पवार म्हणाले, शिवसेनेकडे गरजेपेक्षा जास्त मते असून त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर निवडून जाईल आणि त्यानंतरही काही मते उरतील. सत्तेतील तिसरा पक्ष असलेल्या काँग्रेसकडेही अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे काही कमी-जास्त असेल तर आमचे लोक त्यांना मदत करतील.

राज्यसभेसाठी 41 मते आवश्यक
संभाजीराजेंना राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी 41 मते आवश्यक आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस राज्यसभेसाठी प्रत्येकी एक उमेदवार देतील.
त्यांचे उमेदवार विजयी होऊनही त्यांच्याकडे जास्तीची 27 मते उरतात.

 

तसेच भाजपचे संख्याबळ पाहता त्यांचे दोन उमेदवार सहज विजयी होतील. त्यानंतरही त्यांच्याकडे 22 मते शिल्लक राहतील.
महाविकास आघाडी आणि भाजपने त्यांची अतिरिक्त मते संभाजीराजे भोसले यांना दिल्यास ते विजयी होऊ शकतात.

 

Web Title :- Sharad Pawar | our people will help him ncp chief sharad pawar makes positive statement about sambhaji raje

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Punit Balan Group Women’s Premier League | सातवी ‘पुनित बालन ग्रुप महिला प्रिमियर लीग’ अजिंक्यपद T-20 क्रिकेट स्पर्धा; स्मार्ट लायन्स्, ऑक्सिरीच स्मॅशर्स संघांची विजयी कामगिरी !

 

NCP president Sharad Pawar | केतकी चितळेने केलेल्या असभ्य टिकेवर शरद पवारांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले…

 

Drinking Cold Water Is Good Or Bad | थंड पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते का? जाणून घ्या