समाजाला खुश करण्याचा प्रश्नच नाही : पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

घटनादुरुस्ती कशी होईल हे पवारांनी न सांगितल्यास केवळ मराठा समाजाला खुश करण्यासाठी त्यांचं हे वक्तव्य सीमित राहील असे प्रकाश आंबेडकर यांनी नाशिक येथे म्हटले होते. यांनतर ‘घटनादुरुस्तीतून समाजाला खुश करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले आहे.

विधीमंडळात काळ सर्वपक्षीय बैठक पार पडली आणि कायदेशीर अडचणी दूर करण्याचा दृष्टीने एकत्र पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय यशस्वी कसा होईल, हे पाहणे आमचे काम आहे. ते जर होऊ शकलं तर हा प्रश्न सुटेल, त्या कामाला अधिक प्राधान्य देणे मला महत्त्वाचे वाटते.’ असे पवार म्हणाले.
[amazon_link asins=’B07BHVY55G’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’bb19c799-9322-11e8-a490-01d7beedb508′]

काय म्हणाले होते शरद पवार

मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करा, त्यासाठी सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची जबाबदारी मी उचलेन. घटना बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे. म्हणून संसदेत जाऊन यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही पवारांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले

घटनादुरुस्ती नेमकी कशी होईल, हे पवारांनी स्पष्ट करावं, नाहीतर त्यांचं हे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाला खुश करण्यासाठी होते असे म्हणावे लागेल.