संजय राऊत घेणार असलेली शरद पवारांची मुलाखत ‘या’ कारणामुळे रद्द

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पुण्यामध्ये भेट घेणार होते मात्र सध्या मंत्रीमंडळ विस्तार आणि अनेक घडामोडी राज्यात सुरु असल्यामुळे तूर्तास ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतची माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे.

येत्या २९ डिसेंबर रोजी पुण्यामध्ये संजय राऊत हे शरद पवारांची मुलाखत घेणार होते. पुणेकरांसोबत संपूर्ण राजकीय वर्तुळाचे या मुलाखतीकडे लक्ष लागून होते. विधानसभेचा राज्यातील निकाल लागल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे त्यामुळे शरद पवार या मुलाखतीत काय काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते.

या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत पुण्यातच घेतली होती त्यावेळी शरद पवारांनी चांगलेच शाब्दिक चौकार षटकार मारल्याचे दिसून आले होते.

शिवसेना आणि शरद पवार यांचे नाते काही नवीन नाही मात्र नुकत्याच स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवार हे महत्वाचा दुवा आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यात सत्तास्थापनेसाठी ज्या घडामोडी झाल्या त्यानंतर अनेक गोष्टी बदललेल्या आहेत. त्यामुळे शरद पवार हे राजकीय सामाजिक गोष्टींवर भाष्य तर करतीलच परंतु यावेळी अजित पवार आणि काही कौटुंबिक घडामोडींवर पवार काय बोलणार याकडे देखील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/